Pune Rain : पुण्यात पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम; घाटमाथ्यावर रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे : जुलैच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यानंतर काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार पुनरागमन केले आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस पडत असून पुणे जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 3 दिवस पुणे आणि परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. (Pune Rain)



आज पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. शहर आणि आसपासच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र, पुण्याच्या घाटमाथा भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने त्या भागासाठी रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे विकेंडला पर्यटनासाठी घाटमाथा किंवा डोंगराळ भागात जाण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांनी हवामानाचा अंदाज पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (IMD Alert)

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढू लागला आहे. याचा फायदा शेतीसह पिण्याच्या पाण्यालाही होणार आहे. धरणांमध्ये वाढलेल्या साठ्यामुळे पुणे शहरावरील संभाव्य पाणीटंचाईचे संकटही कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Monsoon Update)



दरम्यान, कोकणातील अनेक भाग आणि लगतच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा अंदाज असल्याने त्या परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, कोकण आणि पुणे परिसरात पडणाऱ्या पावसामुळे प्रमुख धरणांतील जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. (Maharashtra Weather)

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, उत्तर भागात तयार झालेल्या दोन सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे आणि अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या ओलसर वाऱ्यांमुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पुढील 5 दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Heavy Rain)

 
Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.