Ashish Shelar : मुंबईत उभे राहणार अत्याधुनिक वाहन स्क्रॅपिंग केंद्र

- मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; वैज्ञानिक पद्धतीने बेवारस वाहनांची विल्हेवाट लावणार


मुंबई : मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी कमी करणे, रस्त्यांवर धूळ खात पडलेल्या टाकाऊ व बेवारस वाहनांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि राष्ट्रीय वाहन स्क्रॅपिंग (Vehicle Scrapping Centre) धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक 'रजिस्टर्ड व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी' उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी गुरुवारी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते.


या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई जिल्हाधिकारी आँचल गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह परिवहन विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि मुंबई वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Ashish Shelar)



राज्यात जालना, तळोजा, धाराशिव, पालघर, भिवंडी, खालापूर या ठिकाणी वाहन स्क्रॅपिंग (Vehicle Scrapping Centre) सुविधा उपलब्ध असल्या तरी मुंबईच्या हद्दीत अद्याप एकही अधिकृत केंद्र नाही. सध्या मुंबईत सुमारे ५३ लाख वाहने धावत असून त्यात १५ लाख चारचाकी, ३० लाखांहून अधिक दुचाकी आणि ५ ते ६ लाख व्यावसायिक वाहनांचा समावेश आहे. देशातील सर्वाधिक वाहन घनता मुंबईत असल्याने वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न भीषण बनला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतच स्वतंत्र स्क्रॅपिंग सुविधा असणे अत्यंत गरजेचे असल्याचे शेलार (Ashish Shelar) यांनी स्पष्ट केले.


राष्ट्रीय वाहन स्क्रॅपिंग (Vehicle Scrapping Centre) धोरणानुसार २० वर्षांपेक्षा जुनी खासगी आणि १५ वर्षांपेक्षा जुनी व्यावसायिक वाहने फिटनेस चाचणीत अपात्र ठरल्यास स्क्रॅपसाठी पात्र ठरतात. अशा वाहनांसाठी करसवलत, नोंदणी शुल्कात सूट आणि वाहनाच्या मूळ किमतीच्या ४ ते ६ टक्के स्क्रॅप मूल्य देण्याची तरतूद आहे. त्यामुळे मुंबईतील बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी हे केंद्र मैलाचा दगड ठरेल.



पाच एकर जागेवर पीपीपी तत्त्वावर उभारणी :


या प्रकल्पासाठी मुंबई महानगरपालिका किंवा राज्य शासनाच्या उपलब्ध जागेवर सुमारे पाच एकर क्षेत्रात सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर हे स्क्रॅपिंग केंद्र (Vehicle Scrapping Centre) उभारण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी इच्छुक उद्योजकांकडून स्वारस्य अभिव्यक्ती मागवून पालिकेने निविदा प्रक्रिया राबवावी, तसेच परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांनी यात योग्य समन्वय ठेवावा, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी (Ashish Shelar) दिल्या आहेत.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर