FIDE Interim President : विश्वनाथन आनंद फिडेचे हंगामी अध्यक्ष

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित युरोपियन युनियनच्या प्रतिबंधांच्या यादीत विद्यमान अध्यक्ष आर्काडी ड्वोरकोविच यांच्या नावाचा समावेश झाल्यानंतर, त्यांनी पदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे)च्या हंगामी अध्यक्षपदाची धुरा पाच वेळा जागतिक अजिंक्यपद पटकावणारे विश्वनाथन आनंद यांनी स्वीकारली आहे. ड्वोरकोविच, जे मूळचे रशियाचे आहेत, त्यांनी ईयूच्या या निर्णयाला "सर्व मार्गांनी" आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. ईयूच्या या कारवाईमुळे त्यांची खाती जप्त केली जाऊ शकतात आणि प्रवासावर बंदी येऊ शकते. (FIDE Interim President )



विश्वनाथन आनंद हे २०२२ पासून 'फिडे'चे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. फिडे परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे की, "फिडेचे अध्यक्ष म्हणून आर्काडी ड्वोरकोविच यांनी आपले अधिकार, कर्तव्ये आणि विशेषाधिकार तात्पुरते निलंबित ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला फिडे परिषद स्वीकारते आणि पुष्टी देते." निवेदनात पुढे म्हटले आहे, "फिडे सनदच्या कलम १९.२ नुसार, जोपर्यंत ड्वोरकोविच स्विस आणि ईयूच्या सध्या लागू असलेल्या कायद्यांनुसार निर्बंधांच्या कक्षेत आहेत, तोपर्यंत फिडेचे उपाध्यक्ष आनंद विश्वनाथन हे हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहतील." (FIDE Interim President )



आपल्या निवेदनात ड्वोरकोविच यांनी ईयूचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. "आज ईयूने माझे नाव २१ व्या निर्बंधांच्या यादीत समाविष्ट केल्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय बेकायदेशीर आणि अन्यायकारक असल्याचे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, आणि या निर्णयाला सर्व शक्य मार्गांनी तात्काळ आव्हान दिले जाईल. मला खात्री आहे की न्यायाचा विजय होईल. तथापि, जोपर्यंत न्यायालयाचा कोणताही औपचारिक निकाल लागत नाही आणि/किंवा असा निर्णय रद्द किंवा दुरुस्त केला जात नाही, तोपर्यंत हे प्रतिबंध फिडेच्या स्थिर कार्यात अडथळा ठरवू शकतात. त्यामुळे, ईयू आणि स्विस कायदे व नियमांनुसार जोपर्यंत मी या प्रतिबंधांच्या कक्षेत असेन, तोपर्यंत फिडे अध्यक्ष म्हणून माझे अधिकार आणि कर्तव्ये तात्काळ प्रभावाने स्वेच्छेने निलंबित करण्याचा मी निर्णय घेतला आहे,'' असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

इंग्लंड क्रिकेट संघात मोठा बदल! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी अनकॅप्ड खेळाडूला थेट संधी, पाहा संपूर्ण संघ

England vs South Africa : इंग्लंड क्रिकेट संघाने आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आपल्या कसोटी संघाची घोषणा केली आहे. डिसेंबर

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मुंबईचा तडाखा! Syed Mushtaq Ali Trophy 2026 साठी ‘डेंजरस’ संघ जाहीर!

मुंबई: क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. आगामी 'सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026' (Syed Mushtaq Ali Trophy 2026) या अत्यंत रोमांचक

INDW vs SAW: भारतीय महिला संघाची घोषणा; दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघात झाले दोन मोठे बदल

भारतीय महिला संघ स्मृती मंधानाच्या नेतृत्वात आणखी एका मालिकेसाठी सज्ज झाला आहे. नुकतंच स्मृती मंधानाच्या

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामन्यात भारताने विजय

WI vs BAN: दुसरा कसोटी सामना ड्रॉ, वेस्ट इंडिजने बांगलादेशला कसोटी मालिकेत 1-0 ने दिली मात

वेस्ट इंडिज बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत वेस्ट इंडिजने

सँडपेपरगेट प्रकरणी अखेर डेविड वॉर्नरने मौन सोडले, उस्मान ख्वाजा काय म्हणाला? त्यावर केलं भाष्य

क्रिकेटविश्वात 2018 मध्ये सँडपेपरगेट प्रकरण चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ