Nashik : चांदोरी-सायखेड्याला दुसऱ्या दिवशीही पुराचा वेढा कायम, गोदावरीचा पूर ओसरू लागल्याने काहीसा दिलासा

Nashik : नाशिक जिल्ह्यातील चांदोरी आणि सायखेडा या गावांना दुसऱ्या दिवशीही शनिवारी ( दि.२५) पुराच्या पाण्याचा वेढा कायम राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मात्र शनिवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने गोदावरी नदीचा पूर ओसरण्यास सुरुवात झाली असून, नदीपात्रातील पाण्याची पातळी घटू लागल्याने नागरिकांना दिलासा मिळू लागला आहे. दरम्यान, चांदोरी , सायखेड्याची वाहतूक काहीसी सुरळीत झाली असली तरी नांदूरमधमेश्वरची वाहतूक अद्यापही बंदच आहे.



चांदोरी-सायखेड्याला दुसऱ्या दिवशीही पुराचा वेढा कायम


जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शनिवारी दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात झाली असली, तरी निफाड तालुक्यातील चांदोरी आणि सायखेडा या गावांना दुसऱ्या दिवशीही पुराच्या पाण्याचा वेढा कायम होता. विविध धरणांमधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे शुक्रवारी या दोन्ही गावांमध्ये पाणी शिरले होते.



नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन


शनिवारीही गावातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अन्य शासकीय कार्यालये पाण्याखालीच असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत राहिले. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शनिवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच खासदार राजाभाऊ वाजे भगरे यांनी पुरग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.



६ वाजता धरण विसर्ग (क्युसेकमध्ये)


गंगापूर - 8370


कादवा - 5932


भावली - 1821


पालखेड - 3540


पुणेगाव - 1568


जोझरखेड - 1750


होळकर ब्रिज - 12300


दारणा - 13100


गौतमी गोदावरी - 1500


कश्यपी - 500


नांदूर मध्यमेश्वर धरण - 64726


वालदेवी - 2175


भाम - 3892


चणकापूर धरण - 5425

Comments
Add Comment

Navi Mumbai Crime : अवघ्या ४० रुपयांसाठी थेट जीव घेतला! तरुण रिक्षाचालकाची निर्घृण हत्या

नवी मुंबई : अवघ्या ४० रुपयांच्या रिक्षा भाड्यावरून झालेल्या वादातून १८ वर्षीय रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने

FDA Action Navi Mumbai : नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाकडून ७६ लाखांचा माल जप्त

नवी मुंबई : मुदत संपलेले (Expired) खाद्यपदार्थ फेकून न देता, त्यांच्यावर नवीन तारखा छापून ते बाजारात विकणाऱ्या एका

Uzbekistan 30 Days Visa Free Entry : भारतीय पर्यटकांसाठी मोठी खुशखबर! उझबेकिस्तानमध्ये ३० दिवस व्हिसामुक्त प्रवास

नवी दिल्ली : परदेशात फिरण्याचा प्लॅन करणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी मोठी खुशखबर आहे. उझबेकिस्तानने भारतीय

Nepal Flood Rescue : नेपाळ-तिबेट पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी संपर्क नाही; शोधासाठी केंद्राचे विशेष पथक काठमांडूत दाखल

नेपाळ-तिबेट परिसरात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,