Nepal Flood Rescue : नेपाळ-तिबेट पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी संपर्क नाही; शोधासाठी केंद्राचे विशेष पथक काठमांडूत दाखल

नेपाळ-तिबेट परिसरात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. राज्य सरकारकडून या नागरिकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून, बाधित भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारचे विशेष पथक काठमांडूत दाखल झाले आहे. (Nepal Flood)



रिचा टूर्स प्रा. लि.च्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील ६० नागरिकांशी प्रशासनाला अद्याप थेट संपर्क साधता आलेला नाही. तसेच अधिकृत लिंकद्वारे नोंदणी केलेल्या आणखी सात नागरिकांशी संपर्क होणे बाकी आहे. त्यामुळे संपर्कात नसलेल्या नागरिकांची संख्या ६७ झाली आहे. ( Rescue Operation)

२६२ नागरिक सुखरूप परतले


दरम्यान, महाराष्ट्रातील २६२ नागरिक सुखरूप राज्यात परतले आहेत. तर सुरक्षित असल्याची माहिती मिळालेल्या आणखी ७६ नागरिकांशी संपर्क साधण्यात प्रशासनाला यश आले आहे.

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, पूरस्थिती, तसेच रस्ते, वाहतूक आणि दळणवळण यंत्रणा विस्कळीत झाल्यामुळे राज्यातील एकूण ४०५ नागरिक प्रभावित झाले आहेत. ( Indian Embassy Kathmandu)

केंद्राचे विशेष पथक काठमांडूत


बेपत्ता किंवा संपर्कात नसलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारचे विशेष पथक काठमांडू येथे पोहोचले आहे. नेपाळमधील भारतीय राजदूतांनी या पथकाची भेट घेतली असून, बचाव आणि समन्वयाच्या कामाबाबत आवश्यक निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांकडून संपर्कात नसलेल्या ६७ नागरिकांचा शोध घेण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. पूरग्रस्त भागातील परिस्थिती आणि विस्कळीत दळणवळणामुळे प्रशासनासमोर नागरिकांशी संपर्क साधण्याचे मोठे आव्हान आहे. ( Nepal Flood Rescue)
Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.