Pandharpur News : SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या; परिसरात खळबळ!

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल - रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविकांची गर्दी आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरमध्ये आले आहेत. संपूर्ण पंढरपूरमध्ये चोख बंदोबस्त आहे. सुरक्षेसाठी राज्य राखीव पोलिस दलाचे जवान पण मोठ्या संख्येने तैनात आहेत. या अशा वातावरणात भाविकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तावर असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या (SRPF) जवानाने स्वतःकडे असलेल्या शस्त्रातून स्वतःवरच गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आषाढी एकादशीच्या दिवशीच पहाटे घडली. आत्महत्या करणाऱ्या राज्य राखीव पोलिस दलाच्या (SRPF) जवानाचे नाव रामेश्वर ध्रुपद साबणे असे आहे.(Pandharpur News)



आषाढी वारीतील गर्दी आणि सुरक्षा लक्षात घेता SRPF ची तुकडी पंढरपुरात तैनात करण्यात आली होती. या तुकडीतील रामेश्वर ध्रुपद साबणे(Rameshwar Dhrupad Sabne) या जवानाने आत्महत्या केली. पहाटे अडीचच्या सुमारास मंदिरात विठ्ठलाची शासकीय महापूजा सुरू होती. ही पूजा सुरू असतानाच रामेश्वर ध्रुपद साबणेने आत्महत्या केली. गोळीचा आवाज ऐकून सहकारी जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र गंभीर दुखापतीमुळे रामेश्वर ध्रुपद साबणेचा जागीच मृत्यू झाला.(Crime News)



रामेश्वर ध्रुपद साबणेने आत्महत्या केल्याचे लक्षात येताच स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने पुढील कायदेशी कारवाई सुरू करण्यात आली आहे. रामेश्वर ध्रुपद साबणेच्या आत्महत्येचे कारण जाणून घेण्यासाठी तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

Gold Rate Today : आनंदाची बातमी ! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे भावही उतरले

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून

Durga Puja 2026 : नवरात्रीचा उत्साह अन् दुर्गेचा जागर! जाणून घ्या दुर्गापूजेचे संपूर्ण वेळापत्रक, धार्मिक महत्त्व आणि मुख्य विधी

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि मुख्य सणांपैकी एक असलेल्या दुर्गापूजा (Durga Puja) उत्सवाला सुरुवात होत आहे. वाईटावर

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

Nashik Crime : बसस्थानकातील चोऱ्यांचा पर्दाफाश ! 24 लाख 43 हजारांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त ; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Nashik Crime : नाशिक शहरातील बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हेशाखा युनिट क्रमांक १च्या पथकाने