Anupam Kher : आंदोलनाचं निमित्त करून शिव्या देणाऱ्यांना ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सुनावले, केले मोदींचे समर्थन

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मागे घेण्यात आले.जवळपास ३७ दिवस सुरू असलेल्या या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थ्यांसह अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला होता.आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची ग्वाही दिली.या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली.



आंदोलन संपल्यानंतर अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचे समर्थन केले. केवळ एका आंदोलनामुळे देश ठप्प शकत होऊ नाही देशाला भविष्याच्या दिशेने प्रगती करावी लागेल असं ही त्यांनी म्हटल आहे.व्हिडिओत अनुपम खेर म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची लोकशाहीत दखल घेण्यात आली,ही सकारात्मक बाब आहे.मात्र,आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वापरण्यात आलेल्या अपमानास्पद आणि अश्लील भाषेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.





मतभेद आणि टीका लोकशाहीचा भाग असला तरी कोणत्याही निवडून आलेल्या पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा आदर राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच,प्रश्न विचारणे आणि सरकारला जाब विचारणे आवश्यक असले तरी त्यासाठी सभ्य भाषेचा वापर होणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे खेर म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी मतभेद व्यक्त करताना सभ्य भाषा आणि सुसंस्कृत वर्तन राखण्याचे आवाहन केले.एखाद्या देशाची ओळख केवळ त्याच्या नेत्यांमुळे नव्हे,तर नागरिकांच्या भाषा,संस्कार आणि आचरणामुळेही ठरत असते,असे सांगत "मतांमध्ये भिन्नता असू शकते,पण मनांमध्ये दुरावा नसावा,"असा संदेश अनुपम खेर यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिला

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’