MPSC Paper Leak : एमपीएससीच्या 'औषध निरीक्षक' भरतीतील पेपरफुटीला नवे वळण; तक्रारदाराचा 'यू-टर्न'

फेरपरीक्षा देण्यासाठी रचला बनाव?



मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेतील कथित पेपरफुटी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार करणाऱ्या व्यक्तीनेच ती तक्रार बनावट असल्याचा ई-मेल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित परीक्षा पुन्हा व्हावी यासाठीच हा बनाव रचण्यात आल्याचे तक्रारदाराने दुसऱ्या ई-मेलमध्ये म्हटल्याची चर्चा आहे.



एमपीएससीतर्फे २२ मार्च २०२६ रोजी औषध निरीक्षक भरतीची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. १२ जून रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर १ ते २१ जुलै या कालावधीत यशस्वी उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आणि २२ जुलै रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, निवड यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच २३ जुलै रोजी एमपीएससीला ई-मेलद्वारे एक तक्रार प्राप्त झाली. परीक्षेपूर्वी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचा, तसेच काही उमेदवारांचे गुण संशयास्पदरीत्या वाढल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता. तक्रारदाराने व्हॉट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्ड्स आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) फॉरेन्सिक तपासाची मागणीही केली होती.


तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन एमपीएससीने तात्काळ पावले उचलत तक्रारदाराला सर्व उपलब्ध पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, संबंधित संशयित उमेदवार आणि तक्रारदाराला प्रत्यक्ष चौकशीसाठी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. या सर्वांच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई निश्चित केली जाणार होती.



तक्रारीवर चौकशी सुरू असतानाच, गुरुवारी रात्री या प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडल्या. तक्रारदाराने एमपीएससीला आणखी एक ई-मेल पाठवून आपली पूर्वीची तक्रार बनावट असल्याचे कळवले. "जवळच्या काळात पुन्हा परीक्षा होण्याची शक्यता नसल्याने, जुनी परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेतली जावी यासाठीच हा बनाव रचला होता," अशी कबुली तक्रारदाराने या ई-मेलमध्ये दिल्याची माहिती एमपीएससीतील सूत्रांनी दिली आहे. २० मार्च रोजी झालेल्या कथित संभाषणाची तक्रार तब्बल चार महिन्यांनंतर (२४ जुलै) का करण्यात आली, यामागील मूळ कारणांचा तपास आता आयोग करत आहे.



सखोल चौकशी करा - रोहित पवार


हा विषय आता सार्वजनिक झाला असून परीक्षार्थींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तक्रारदार आज काय विधान करतोय यापेक्षा आमच्याकडे आलेल्या पुराव्यांवर सरकार आणि आयोग काय कारवाई करते, हे महत्त्वाचे आहे. सोनम वांगचुक यांच्यासारख्या व्यक्तीवर उपोषण मागे घेण्यासाठी दबाव आणला जाऊ शकतो, तर मग या साध्या तक्रारदारावर दबाव आणला गेला नाही कशावरून? त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य