Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी व्यायाम आणि Morning Walk करतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदे होतात यात काही शंका नाही. पण रात्रीच्या जेवणानंतर चालणे सुद्धा शरीरासाठी तितकेच फायदेशीर असते.


अनेक लोक रात्रीच्या जेवणानंतर TV पाहत बसतात किंवा लगेच झोपतात परंतु, या सवयी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. जेवणानंतर शरीराची हालचाल झाली नाही तर पचनसंस्था मंदावते. ज्यामुळे गॅस, अपचन, पोट फुगणे आणि वजन वाढणे यांसारख्या समस्या उद्भवतात. जेवल्यानंतर लगेच पाठीवर टेकल्यास पोटातील पाचक रस आणि अन्न उलटे अन्ननलिकेत येण्याचा धोका जास्त असतो. याला वैद्यकीय भाषेत ॲसिड रिफ्लेक्स किंवा छातीत जळजळ होणं असं म्हणतात.



रात्रीच्या जेवणानंतर शरीरातील ब्लड शुगर लेव्हल अत्यंत वेगाने वाढते. अशावेळी १० ते १५ मिनिटे चालल्यास आपल्या शरीरातील स्नायू रक्तातील ग्लुकोजचा ऊर्जेसाठी वापर करू लागतात. यामुळे जेवणानंतर अचानक वाढणारी साखरेची पातळी नियंत्रणात राहते. प्री-डायबिटीज आणि मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी रात्रीचा हा १५ मिनिटांचा वॉक (walk) एखाद्या औषधासारखा काम करतो.


शतपावली :


रात्रीच्या जेवणानंतर रोज नियमितपणे फक्त १० ते १५ मिनिटे चालल्याने पचन प्रक्रिया वेगाने सुरू होते, पोटाशी संबंधित ९० टक्के आजार दूर राहतात. ॲसिडिटी किंवा अपचन होत नाही. शरीर आतून निरोगी राहते. बरेचं लोक शरीराचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी अनेक प्रकारची औषधे आणि डिटॉक्स ड्रिंक्स घेतात पण, जेवणानंतर केलेली १० ते १५ मिनिटांची शतपावली (nightwalk) औषधाप्रमाणेच काम करते आणि शरीराला अनके फायदे मिळवून देते.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''