Nashik : आपले सरकार प्रणालीत राज्यात नाशिकचा ७ वा क्रमांक

Nashik : शासनाच्या आपले सरकार पोर्टल (Aaple Sarkar Portal) वरील लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत सेवा वितरणाच्या राज्यस्तरीय मूल्यमापनात नाशिक जिल्ह्याने ८.७६ गुणांसह राज्यात ७ वा क्रमांक प्राप्त केला आहे. राज्यातील सर्वाधिक अर्ज हाताळूनही ९३ टक्के अर्ज निर्धारित कालावधीत निकाली काढण्याची उल्लेखनीय कामगिरी जिल्हा प्रशासनाने (District Administration) केली आहे. (Nashik News )



९३ टक्के अर्ज निर्धारित मुदतीत पूर्ण


शासनाने २० जुलै २०२६ पर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या अहवालात जून २०२६ मधील नवीन अर्ज तसेच जानेवारी २०२६ पासून प्रलंबित अर्जांचा विचार करण्यात आला आहे. ‘वेळेत निपटारा’ (७० टक्के) आणि ‘नागरिकांचा प्रतिसाद’ (३० टक्के) या निकषांवर आपले सरकार स्कोअर निश्चित करण्यात आला असून, नाशिकला ८.७६ गुण मिळाले आहेत. जून २०२६ मध्ये नाशिक जिल्ह्यात १ लाख ५४ हजार ९८४ नवीन अर्ज प्राप्त झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणातील अर्जांपैकी जिल्हा प्रशासनाने १ लाख ४८ हजार २३४ अर्जांचा यशस्वी निपटारा केला असून, त्यापैकी ९३ टक्के अर्ज लोकसेवा हक्क कायद्यानुसार (Right to Public Service Act) निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यात आले आहेत. (Nashik News )



पहिल्या क्रमांकावर हिंगोली


राज्यातील पहिल्या तीन क्रमांकावरील हिंगोली (८.९५ गुण), अहिल्यानगर (८.९१ गुण) आणि सातारा (८.८२ गुण) यांच्या तुलनेत नाशिकच्या (Nashik) गुणांमध्ये फारसा फरक नाही. नागरिकांच्या प्रतिसादाच्या निकषावर नाशिकला ५ पैकी ४.६ गुण मिळाले असून, ही कामगिरी सातारा जिल्ह्याइतकीच आहे. नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. वेळेत निपटाऱ्याचे प्रमाण आणखी वाढल्यास नाशिक जिल्हा राज्यातील अव्वल तीन जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवू शकेल, असा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (District Collector Ayush Prasad) यांनी व्यक्त केला आहे. (Nashik News )



अर्ज फेटाळण्याचे प्रमाण केवळ ०.४ टक्के


अर्ज फेटाळण्याचे प्रमाण नाशिक (Nashik)  जिल्ह्यात केवळ ०.४ टक्के असून, अर्जांची अचूक छाननी, मार्गदर्शन आणि पारदर्शक सेवा वितरण प्रक्रिया यामुळे ही कामगिरी साध्य झाली आहे. जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत ८ हजार ९९८ अर्ज विविध विभागांकडे प्रलंबित आहेत. त्यापैकी २० टक्के अर्ज लोकसेवा हक्क कायद्यानुसार निर्धारित मुदतीत असल्याने प्रलंबित प्रकरणांच्या व्यवस्थापनातही नाशिकची स्थिती समाधानकारक आहे.

Comments
Add Comment

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात