Mansoon Hacks : पावसाळ्यात फ्रिजमध्ये पाणी जमा होतंय ? मग करा हा उपाय

पावसाळ्यात एक समस्या घरोघरी दिसून येते ती म्हणजे फ्रिजमध्ये पाणी जमा होणे. कधी भाज्यांच्या ट्रेमध्ये पाणी जमा होतं. तर कधी फ्रिजच्या मागच्या भिंतीवर पाण्याचे थेंब दिसतात. तुम्हाला वाटत असेल की, फ्रिजमध्ये बिघाड झाल्यामुळे असं होत असेल. तर थांबा, फ्रीजच्या काही सेटिंग मध्ये बदल केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.


फ्रिजमध्ये पाणी का जमा होतं ?


पावसाळ्यात हवेत ओलावा वाढतो. ज्यावेळी आपण वारंवार फ्रिज उघडतो, तेव्हा बाहेरची ओलसर हवा फ्रिजच्या आत जाते. सामान्य तापमानातील हवा जेव्हा अतिथंड वातावरणात येताच (बाष्प) हवेचे द्रवात रूपांतर होते. यामुळे फ्रिजच्या आत पाणी जमा होते.


फ्रिजच्या आत पाणी जमा होऊ नये म्हणून करायच्या Settings :


पावसाळ्यात तुमच्या फ्रिजमध्ये पाणी जमा होत असेल. तर सर्वात आधी फ्रिजचं Temperature Control चेक करा.
मान्सूनमध्ये फ्रिज खुप जास्त गार ठेवण्याची गरज नसते.
तापमान 3 ते 5 डिग्री सेल्सियस दरम्यान ठेवणं उत्तम.
तुमच्या फ्रिजमध्ये नंबरचं कंट्रोल नॉब असेल. तर त्याला मिड लेव्हल म्हणजेच 3 किंवा 4 वर ठेवा.
एकदम कमी तापमान ठेवल्यावर आत जास्त कंडेनसेशन तयार होऊ शकतं. ज्यामुळे पाणी जमा होण्याची समस्या वाढते.



फ्रिज वारंवार उघड-बंद करू नका :


पावसाळ्यात दरवेळी फ्रिज उघडल्यावर बाहेरचा ओलावा आत पोहोचतो. यामुळे गरज नसताना फ्रीज बंद ठेवायचा प्रयत्न करा.


Door Gasket चेक करा :


फ्रिजच्या दरवाज्यावर असणार रबर तपासून पाहा. तो सुस्थित नसेल तर त्वरित बदलून घ्या. रबर खराब झाले असेल तर बाहेरची हवा आत येण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे फ्रीज मध्ये पाणी जमा होण्याची आणि फ्रीज मध्ये बिघाड होण्याची शक्यता वाढते.


Drain Hole ची स्वस्छता गरजेची :


फ्रिजच्या आत उपलब्ध ड्रेन होल बंद असल्यावरही पाणी बाहेर निघू शकत नाही आणि खाली जमा होते. वेळोवेळी याची स्वच्छता केल्याने ही समस्या दूर होऊ शकते.


फ्रिजमध्ये गरजेपेक्षा जास्त सामान ठेवू नका :

फ्रिज पूर्णपणे भरलेला असे तर आत गार हवेचा प्रवाह योग्य प्रकारे वाहू शकत नाही. यामुळे काही भागांमध्ये जास्त ओलावा तयार होतो. फ्रिजमध्ये सामान अशा प्रकारे ठेवा की, हवा सहज चारही बाजूला फिरू शकेल.



गरम जेवण थेट फ्रिजमध्ये ठेवू नका :


अनेक लोक गरम जेवण थेट फ्रिजमध्ये ठेवतात. यामुळे वाफ तयार होते आणि ती पाण्याच्या थेंबांमध्ये रुपांतरीत होते. म्हणून नेहमी जेवण सामान्य तापमानावर आल्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवा.


टेक्निशियनला कधी बोलवावं?


तापमान योग्य ठेवणे, ड्रेन होल स्वच्छ करणे आणि डोअर सील चेक केल्यानंतरही सतत पाणी जमा होत असेल. तर हा फ्रिजच्या कूलिंग सिस्टम, सेन्सर किंवा इतर टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो. अशावेळी कोणत्याही अधिकृत सर्व्हिस सेंटर किंवा प्रशिक्षित टेक्निशियनकडून फ्रीजची तपासणी करून घ्या.

Comments
Add Comment

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार

Koffee with Karan: - "मेरे करण अर्जुन आएंगे..." निर्माता करण जोहर नवा चित्रपट आणण्याच्या तयारीत...

चित्रपट निर्माता करण जोहरयाने आजवर वेगवेगळ्या कार्यक्रमातून चाहत्याची मने जिंकली आहेत. आता करण जोहर 'कॉफी विथ

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरात वातावरण तापलं! नकुलसाठी आसिफवर चिडली लव्ह; यंग आणि स्काऊटमध्ये सुद्धा बाचाबाची

Bigg Boss 20 च्या घरात नेहमीच काहीना काही रंजक गोष्टी घडत असतात. अनेकदा स्पर्धकांमध्ये भांडणं होतात. कधी कधी तर ही भांडणं