Shirdi : साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा; सुवर्णदानाचा मोठा वर्षाव ; तीन दिवसांत ७.८१ कोटींचं दान

Shirdi : शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी झाली असून लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. साईबाबांच्या तीनदिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवासाठी देश-विदेशातील लाखो भाविकांनी दर्शन घेतले आहे. त्याचबरोबर लाखो भाविकांनी दर्शनासह साईबाबांच्या चरणी दान केले आहे. गुरूपौर्णिमा उत्सवात (Gurupuarnima) साईचरणी कोट्यवधींची गुरूदक्षिणा भाविकांकडून दान करण्यात आली आहे.


श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने बुधवार दि. २८ जुलै २०२६ ते शुक्रवार दि. ३० जुलै २०२६ या कालावधीत आयोजित केलेल्‍या श्री गुरूपौर्णिमा उत्‍सवामध्‍ये रुपये ७ कोटी ८१ लाख १३ हजार ३७७ इतकी देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.



तीन दिवसांत ७.८१ कोटींचं दान


सदर देणगी मध्‍ये रोख स्‍वरुपात रुपये ०२ कोटी ०४ लाख ३५ हजार ५५७ दक्षिणा पेटीत प्राप्‍त झाली असून, देणगी काऊंटरवर ०१ कोटी २५ लाख ४७ हजार ९३५ रुपये, पी.आर.ओ.देणगी ८७ लाख १४ हजार, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर असे एकूण ०२ कोटी ०७ लाख ८४ हजार ७०१ रुपये, परकीय चलनाद्वारे ०५ लाख ६५ हजार ९९१ रुपये, सोने १,१२५.५७० ग्रॅम प्राप्‍त झाले असून त्‍याचे मुल्‍य रक्‍कम रुपये ०१ कोटी ४६ लाख ७४ हजार ५४४ व चांदी २,३७६.५०० ग्रॅम प्राप्‍त झाली असून तीचे मुल्‍य रक्‍कम रुपये ०३ लाख, ९० हजार ६४९ असे आहे.



साईप्रसादालयात लाखो साईभक्‍तांना भोजन प्रसाद


श्री गुरूपौर्णिमा उत्‍सव कालावधीत साधारणतः ०३ लाखाहून अधिक साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. उत्‍सव कालावधीमध्‍ये श्री साईप्रसादालयाद्वारे सुमारे ०१ लाख ९४ हजार २८५ साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा तर ३९,६११ अन्‍नप्रसाद पाकिटांचा लाभ घेतला. दर्शन रांगेत ०१ लाख ६५ हजार २०० साईभक्‍तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्‍यात आले. या कालावधीत ७१ लाख ०७ हजार ३६० रूपये सशुल्‍क प्रसादरुपी लाडू पाकीटांच्‍या माध्‍यमातून प्राप्‍त झाले.



पहिल्याच दिवशी एक कोटींचा सुवर्ण मुकुट


उत्सवाच्या पहिल्या दिवशी आंध्र प्रदेशातील साईभक्त मल्लादी श्रीनिवासन राव यांनी साईबाबांना सुमारे एक कोटी रुपये मूल्याचा 642 ग्रॅम वजनाचा सूवर्ण मुकुट अर्पण केला. या मुकुटावर अत्यंत आकर्षक नक्षीकाम करण्यात आले असून त्यात सूर्य,चंद्र,नवग्रह,व्याल मूर्ती आणि नवरत्नांची सुंदर जडणघडण करण्यात आली आहे. या मुकुटाने साईबाबांच्या अलंकारात आणखी भर पडली. याच दिवशी साईबाबांच्या चरणी 120 ग्रॅम वजनाचे सुवर्ण ओम आणि एक छोटा सुवर्ण मुकुट देखील दान करण्यात आला.



मुख्य दिवशी 47 लाखांचा सुवर्ण हार


गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी मुंबईतील एका साईभक्ताने आपली ओळख गुप्त ठेवत जवळपास 300 ग्रॅम वजनाचा आणि अंदाजे 47 लाख रुपये मूल्याचा सुवर्ण हार साईचरणी अर्पण केला. हे गुप्तदान असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानने दिली. या सुवर्ण हारामुळे गुरुपौर्णिमेच्या उत्सवात सुवर्णदानाची चर्चा अधिक रंगली.



सुवर्ण साखळीची भक्तिभेट


उत्सवाच्या सांगता दिनीही सुवर्णदानाची परंपरा कायम राहिली. तामिळनाडूतील चेन्नई येथील साईभक्त आर. वेत्री सेल्वी अव्वल राज यांनी 32 ग्रॅम वजनाची आकर्षक नक्षीकाम असलेली सुवर्ण साखळी साईबाबांच्या चरणी अर्पण केली. या सुवर्ण साखळीचे अंदाजे मूल्य 4 लाख 21 हजार रुपये असून, साईबाबांप्रती असलेल्या त्यांच्या नितांत श्रद्धेचे हे प्रतीक मानले जात आहे.


यंदाच्या गुरुपौर्णिमा उत्सवात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या सुवर्णदानामुळे शिर्डी पुन्हा एकदा देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. साईभक्तांनी अर्पण केलेले सुवर्ण अलंकार हे केवळ मौल्यवान दागिने नसून, साईबाबांप्रती असलेल्या अढळ श्रद्धा, विश्वास आणि गुरुभक्तीचे जिवंत प्रतीक असल्याची भावना अनेक भक्तांनी व्यक्त केली. गुरुपौर्णिमेच्या या उत्सवाने शिर्डीतील भक्ती, सेवा आणि समर्पणाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित केली.

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.