Harsh Singh : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हर्ष सिंगची सुवर्णमय कामगिरी; भारताच्या पुरुष ज्युडोमध्ये पहिल्यांदाच गोल्ड

Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ भारताच्या ज्युडोपटूंनी दमदार कामगिरी करत आणखी दोन पदकांची कमाई केली आहे. पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात हर्ष सिंगने सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला, तर महिलांच्या 48 किलो वजनी गटात अस्मिता डे हिने कांस्यपदक पटकावून भारताची पदकसंख्या वाढवली. ( Harsh Singh)


हर्ष सिंग हा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात पुरुषांच्या ज्युडो प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अंतिम सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ कॅट्झचा एकतर्फी 10-0 अशा फरकाने पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत हर्षने सातत्यपूर्ण आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. त्याच्या या ऐतिहासिक यशामुळे भारतीय ज्युडोला नवी ओळख मिळाली आहे. ( Commonwealth Games 2026)


दिल्लीचा रहिवासी असलेला हर्ष सिंग गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक ही त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे. (Bronze Meddal)



महिलांच्या 48 किलो वजनी गटात अस्मिता डे हिनेही शानदार खेळ करत कांस्यपदक जिंकले. पदकाच्या लढतीत तिने कॅनडाच्या हेडी क्वाचचा 2-1 असा पराभव केला. अखेरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अस्मिताने संयम आणि उत्कृष्ट तंत्राचा वापर करत विजय मिळवला.


अस्मिता डेच्या यशामागे तिच्या कुटुंबाचा मोठा संघर्ष आहे. तिचे वडील अर्जुन कुमार डे यांचे सायकल दुरुस्तीचे छोटे दुकान असून मर्यादित उत्पन्नात त्यांनी मुलांच्या शिक्षणासह क्रीडा प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळली. आर्थिक अडचणी असूनही त्यांनी मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठिंबा दिला. आज अस्मिताच्या या यशामुळे त्यांच्या मेहनतीचे चीज झाले आहे. (CWG 2026)




Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून