Nashik : सात दिवसांत 'नाशिक खड्डेमुक्त’, मंत्री गिरीश महाजनांचा प्रशासनाला अल्टिमेटम

Nashik : नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकांचा वाढता रोष आणि अपघाती मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी प्रशासनाला थेट अल्टिमेटम दिला आहे. येत्या सात दिवसांत नाशिक शहर खड्डेमुक्त झाले पाहिजे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. शनिवार (दि. १) पासून खड्डे बुजविण्याच्या मोहिमेला सुरुवात होणार असून, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे पुढील २५ ते ३० वर्षांचा रस्त्यांचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचा दावा महाजन यांनी केला. ( Nashik News )



मंत्री गिरीश महाजनांचा प्रशासनाला दणका


शहरातील रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांमुळे झालेले मृत्यू आणि नागरिकांच्या संतापाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी महापालिकेतील स्थायी समितीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी रस्ते दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेत ठेकेदार आणि प्रशासनाला तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस महापौर हिमगौरी आहेर-आडके, स्थायी सभापती मच्छिंद्र सानप, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, आयुक्त मनीषा खत्री स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ( Nashik News )



खड्डे बुजविताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना


मंत्री गिरीश महाजन म्हणाले, "रस्त्यांमुळे नागरिकांना त्रास होणार नाही, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. ठेकेदार कामे वेळेत करीत आहेत की नाही, याची तपासणी करा. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा. आवश्यक ती मदत शासन स्तरावर केली जाईल. रस्ते कामांच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे, अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेणे तसेच खड्डे बुजविताना मुरूम-मातीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ( Nashik News )



रस्ते कामात कुचराई करणाऱ्या ठेकेदारांना मोठा दंड


शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामात एमएनजीएलच्या खोदकामामुळे अडथळे येत असल्याची तक्रार आयुक्त मनीषा खत्री यांनी केली. कंपनीकडून कामांची पूर्वकल्पना महापालिकेला दिली जात नसून थेट रस्ते खोदले जात असल्याचे खत्री यांनी सांगितले. बैठकीसाठी एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते; मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांना शनिवारी बोलावण्याचे निर्देश मंत्री महाजन यांनी दिले. दरम्यान, रस्ते कामात कुचराई करणाऱ्या ठेकेदारांना सहा कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. ( Nashik News )



कोतकर कुटुंबाला नोकरी, शिक्षणाची जबाबदारी


खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या नीलेश कोतकर यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देताना मंत्री महाजन म्हणाले, "कोतकर कुटुंबीयांप्रती आमची सहानुभूती आहे. त्यांच्या पत्नीला नोकरी देण्यात येईल. त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी महापौरांनी घेतली असून तिची पुढील जबाबदारी आपण स्वीकारू."खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



खड्डे बुजविण्याची मोहीम


रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी प्रशासनाकडून खड्ड्यांची पाहणी सुरू करण्यात आली आहे. सातपूर-अंबडसह शहरातील सर्व भागांमध्ये दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असून, संपूर्ण शहर खड्डेमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


हिमगौरी आहेर-आडके, महापौर

Comments
Add Comment

सचिन सानप शिवसेनेचा उमेदवार नाही! उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत समन्वयाचा अभाव दिसत असताना, उद्योगमंत्री उदय सामंत

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

Gold Rate Today : आनंदाची बातमी ! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे भावही उतरले

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून

Durga Puja 2026 : नवरात्रीचा उत्साह अन् दुर्गेचा जागर! जाणून घ्या दुर्गापूजेचे संपूर्ण वेळापत्रक, धार्मिक महत्त्व आणि मुख्य विधी

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि मुख्य सणांपैकी एक असलेल्या दुर्गापूजा (Durga Puja) उत्सवाला सुरुवात होत आहे. वाईटावर

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला