Hrithik Roshan : ऑफिससाठी जागा भाड्याने देऊन अभिनेता हृतिक रोशन कमावतो अफाट पैसा

मुंबई : बॉलिवूडचे अनेक कलाकार सिनेसृष्टीतील अस्थिरतेचा विचार करून आर्थिक सुरक्षेसाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करत आहेत. अभिनेता हृतिक रोशनसह काही कलाकारांनी आता मोठमोठ्या कार्यालयीन जागांमध्ये (Office Space) गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. कार्यालयीन जागा विकत घेऊन ती भाड्याने देऊन त्यातून निश्चित असे उत्पन्न कमावणे हा बड्या कलाकारांसाठी नवा व्यवसाय झाला आहे.



हृतिक रोशनने मुंबईच्या पश्चिम उपनगरात कार्यालयीन वापरासाठी (Office Space) सहा हजार चौरसफुटांची जागा खरेदी केली आहे. अंधेरी पश्चिमेला न्यू लिंक रोडवर नीलकमल बिझनेस पार्कमध्ये ही जागा आहे. ही कार्यालयीन वापराची जागा हृतिक रोशनने आता भाड्याने दिली आहे. यात एकूण सात युनिट्स आहेत. तसेच बिझनेस पार्कमध्ये कार पार्किंगच्या सात जागा पण हृतिककडे आहेत. हृतिकने ही पार्किंग स्पेस आणि ऑफिस स्पेस भाड्याने देऊन निश्चित असे उत्पन्न कमावण्यास सुरुवात केली आहे.



कागदपत्रांतील नोंदीनुसार हृतिक रोशनकडून भाड्याने घेतलेल्या कार्यालयीन जागेसाठी भाडेकरूने ६८ लाख रुपयांची सुरक्षा ठेवा अर्थात सिक्युरिटी डीपॉझिट दिले आहे. भाडेकरार अर्थात लीज अॅग्रीमेंट २९ जून २०२६ रोजी रजिस्टर्ड झाले आहे. करार १ एप्रिल २०२६ पासून ३१ मार्च २०३१ पर्यंत चालणार आहे. करारांतर्गत भाडेकरू दरमहा १७ लाख रुपये अशा पद्धतीने पुढील तीन वर्ष आणि नंतरच्या दोन वर्षांसाठी दरमहा १९.५५ लाख रुपये भाडे म्हणून देणार आहे. या भाडेकरारामुळे हृतिक रोशनला दरमहा लाखो रुपयांची निश्चित अशी कमाई होत आहे.



हृतिकने फक्त मुंबईतच नाही तर पुण्यातही ऑफिस भाडेपट्टीवर देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. या नव्या व्यवसायामुळे हृतिक दरमहा मोठी कमाई करत आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’