Antilia Explosives Case : सचिन वाझे, प्रदीप शर्मावर आरोप निश्चित, अँटिलिया स्फोटके प्रकरणाला गती

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळल्याचे प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात कायदेशीर घडामोड समोर आली आहे. मुंबईच्या विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा न्यायालयाने शनिवारी (१ ऑगस्ट ) या गाजलेल्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण दहा जणांवर औपचारिकपणे आरोप निश्चित केले आहेत.



आरोपींनी स्वतःवर केलेले आरोप फेटाळत आपण निर्दोष असल्याचे म्हटल्यानंतर, विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी हे आरोप निश्चित केले. आता या सर्व आरोपींना हत्येचे गुन्हे आणि कठोर अशा 'यूएपीए' कायद्यांतर्गत खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. या अत्यंत बहुचर्चित आणि संवेदनशील प्रकरणात आता आरोप निश्चित झाल्यामुळे खटल्याच्या प्रत्यक्ष कामकाजाला आणि साक्षीदारांच्या जबाबांना गती मिळणार आहे. माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्यासह अन्य आठ आरोपी आता न्यायालयात कायदेशीर लढाई लढणार आहेत.



दक्षिण मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या बहुमजली निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारी २०२१ रोजी एका एसयूव्ही कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर या कारचे मालक असल्याचे सांगणारे ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हे ५ मार्च २०२१ रोजी ठाण्याच्या खाडीत मृतावस्थेत आढळले होते. या दोन्ही घटनांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते.



वाझेचा सहभाग


या प्रकरणाचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने आरोप केला आहे की, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यानेच उद्योगपतींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी केली होती. श्रीमंत व्यक्तींमध्ये दहशत निर्माण करून, एका उच्चपदस्थ राजकीय व्यक्तीने ठरवून दिलेले १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे मासिक उद्दिष्ट पूर्ण करणे हा यामागील मुख्य उद्देश होता. तसेच, स्वतःची 'सुपर कॉप' म्हणून गेलेली पत आणि प्रतिश प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी वाझेने हे कृत्य केले होते, असेही तपास यंत्रणेने स्पष्ट केले.



मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट


एनआयएच्या आरोपानुसार, स्फोटकांच्या या प्रकरणात सर्व दोष आपल्यावर घ्यायला मनसुख हिरेन यांनी स्पष्ट नकार दिला होता. ते या कटाचा पर्दाफाश करू शकतात आणि ही साखळी तोडू शकतात, या भीतीपोटी हिरेन हे पोलिसांसाठी आणि या कटातील सूत्रधारांसाठी एक 'कमकुवत दुवा' ठरत होते. याच कारणातून सचिन वाझेने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मनसुख हिरेन यांचा काटा काढण्याचा म्हणजेच त्यांच्या हत्येचा कट रचला.

Comments
Add Comment

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

Gold Rate Today : आनंदाची बातमी ! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे भावही उतरले

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून

Durga Puja 2026 : नवरात्रीचा उत्साह अन् दुर्गेचा जागर! जाणून घ्या दुर्गापूजेचे संपूर्ण वेळापत्रक, धार्मिक महत्त्व आणि मुख्य विधी

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि मुख्य सणांपैकी एक असलेल्या दुर्गापूजा (Durga Puja) उत्सवाला सुरुवात होत आहे. वाईटावर

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

Nashik Crime : बसस्थानकातील चोऱ्यांचा पर्दाफाश ! 24 लाख 43 हजारांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त ; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Nashik Crime : नाशिक शहरातील बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हेशाखा युनिट क्रमांक १च्या पथकाने