Private Detectives : खासगी गुप्तहेरांवर येणार कायद्याचा वॉच! सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला मोठे निर्देश

नवी दिल्ली : देशभरात कार्यरत असलेल्या खासगी गुप्तहेर (Private Detectives) संस्थांवर कायदेशीर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केंद्र सरकार आणि विधी आयोगाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या गोपनीयतेचे संरक्षण, खासगी तपास प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी खासगी गुप्तहेर संस्थांचे नियमन करणारा स्वतंत्र आणि सर्वसमावेशक कायदा करण्याची शिफारस न्यायालयाने केली आहे.


न्यायमूर्ती संजय करोल आणि विपुल एम. पंचोली यांच्या खंडपीठाने 'हिमांशू चोर्डिया विरुद्ध राजस्थान राज्य' या वैवाहिक वादाशी संबंधित प्रकरणात हा महत्त्वपूर्ण निर्णय नोंदवला. या प्रकरणात खासगी गुप्तहेर संस्थेने गोळा केलेली छायाचित्रे, व्हिडिओ आणि अन्य माहिती पुरावा म्हणून सादर करण्यात आली होती. (Supreme Court)



खासगी तपासाचे पुरावे आपोआप ग्राह्य नाहीत :


सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, खासगी गुप्तहेरांनी गोळा केलेले पुरावे ना आपोआप ग्राह्य धरता येतात, ना थेट फेटाळता येतात. अशा पुराव्यांची ग्राह्यता भारतीय पुरावा कायद्यातील निकषांवर अवलंबून असेल. (Supreme Court)


विशेषतः इलेक्ट्रॉनिक पुरावे सादर करताना त्यांचा स्रोत, सत्यता, संकलनाची कायदेशीर प्रक्रिया, डेटा सुरक्षित ठेवण्याची साखळी (Chain of Custody) आणि आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता अनिवार्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. केवळ 65B प्रमाणपत्र सादर करणे पुरेसे नसून पुराव्यात कोणताही फेरफार किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून बदल झाला नसल्याची खात्रीही आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. (Supreme Court)



गोपनीयतेच्या अधिकारावर भर :


न्यायालयाने के.एस. पुट्टस्वामी प्रकरणाचा संदर्भ देत नागरिकांच्या गोपनीयतेचा मूलभूत अधिकार अधोरेखित केला. कोणत्याही नियंत्रणाशिवाय खासगी गुप्तहेरांकडून केली जाणारी पाळत ही वैयक्तिक स्वातंत्र्य आणि गोपनीयतेस गंभीर धोका ठरू शकते, असा इशाराही न्यायालयाने दिला. (Supreme Court)



नव्या कायद्यात काय असावे?


सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खासगी गुप्तहेर संस्थांसाठी खालील बाबींचा समावेश असलेला कायदा करण्याची शिफारस केली आहे.


- खासगी गुप्तहेर संस्थांसाठी अनिवार्य परवाना आणि नोंदणी व्यवस्था
- तपासनीसांसाठी पात्रतेचे निकष आणि व्यावसायिक मानके
- आचारसंहिता आणि उत्तरदायित्वाची स्पष्ट यंत्रणा
- बेकायदेशीर पाळत आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाविरोधात संरक्षण
- पुरावे संकलन, जतन आणि वापरासाठी एकसमान नियमावली



देशात हजारो खासगी गुप्तहेर संस्था :


न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, भारतात सध्या 3,000 ते 5,000 खासगी गुप्तहेर संस्था कार्यरत असून या क्षेत्रात 30,000 ते 50,000 कर्मचारी काम करत आहेत. वैवाहिक वाद, कर्मचारी पडताळणी, कॉर्पोरेट फसवणूक, विमा दावे, सायबर तपास आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध अशा विविध कामांसाठी या संस्थांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, या क्षेत्रासाठी अद्याप कोणताही स्वतंत्र केंद्रीय कायदा अस्तित्वात नसल्याने नियमनाची आवश्यकता असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. (Supreme Court)

Comments
Add Comment

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?