Jalgaon : रेल्वेतून पडला, सुदैवाने वाचला ; एकदा मृत्यूला हुलकावणी दिली मात्र ती चूक जिवावर बेतली... काळाने त्याला हिरावलेच

Jalgaon :ळगाव जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. काळ जवळ आलेल्या एका तरुणाने एकदा मृत्यूला हुलकावणी दिली मात्र त्याच्या एका चुकीने त्याला पुन्हा मृत्यूच्या दाढेत खेचून नेले. मनोज झा (३२, रा. जरंगलोई, जि. सुंदरगड, ओडिशा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. (Jalgaon News)



नेमकं काय घडलं ?


मनोज झा (Manoj Jha) आणि त्याचा भाऊ सुरेन झा (Suren Jha) हे दोन ऑगस्ट रोजी रेल्वेने आपल्या मूळ गावी परत जात होते. प्रवासादरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबल्यानंतर मनोज पाणी घेण्यासाठी खाली उतरला. यावेळी रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात तो खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी (Railway Police) त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (Jalgaon News)



...तर कदाचित जीव वाचला असता


मात्र रुग्णालयात त्याची एक चूक त्याला महागात पडली आहे. उपचार सुरू असताना सायंकाळच्या सुमारास मनोज हा कोणालाही काही न सांगता रुग्णालयातून निघून गेला. जखमी अवस्थेतील रुग्ण अचानक बेपत्ता झाल्याने काही काळ रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, रात्रीच्या वेळी शासकीय तंत्रनिकेतन परिसरात तो आढळून आला. १०८ रुग्णवाहिका चालकाने तत्काळ त्याला पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (Government Medical College Hospital) दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (Jalgaon News)



पोलिसांकडून तपास सुरु


धक्कादायक म्हणजे या घटनेबाबत त्याच्या सोबत आलेल्या भावाला याची कुठलीही कल्पना नव्हती. अपघातानंतर मनोजसोबत असलेला त्याचा भाऊ सुरेन झा रेल्वेने पुढे नागपूरपर्यंत गेला होता. मात्र, भाऊ सोबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तो पुन्हा भुसावळला परतला. आणि त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी शोध घेऊनही मनोजचा पत्ता लागला नाही. त्यामुळे त्याने ही माहिती ओडिशातील (Odisha) नातेवाईकांना कळवली. त्यानंतर नातेवाईक जळगाव (Jalgaon) येथे दाखल झाले. तोपर्यंत मृतदेहाची रुग्णालयात अनोळखी म्हणून नोंद करण्यात आली होती. नातेवाईकांनी रुग्णालयात येऊन मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर मृत व्यक्ती मनोज झा असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात (Industrial Estate Police Station) अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हवालदार ओमप्रकाश सोनी करीत आहेत.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा