Pranit More Ghayal : ३७० रुपयांच्या 'बिर्याणी वादा'नंतर प्रणित मोरेचा कमबॅक! नव्या शोचे नाव 'घायल'; युझर्सकडून समय रैनासोबत तुलना

मुंबई : चर्चेत राहिलेल्या ३७० रुपयांच्या बिर्याणी वादानंतर काही महिन्यांनी प्रसिद्ध कॉमेडीयन प्रणित मोरे (Pranit More) पुन्हा एकदा 'स्टँड-अप कॉमेडी'च्या (Stand Up Comedy) मंचावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. बुधवारी (५ ऑगस्ट) प्रणितने त्याच्या आगामी नवीन स्टँड-अप शोची अधिकृत घोषणा केली. 'घायल' असे या शोचे नाव असून, या कार्यक्रमात तो वादाच्या काळातील टीका, आलेल्या अडचणी आणि मानसिक प्रवासाचे अनुभव प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.



"घायल... जे घडले ते बदलू शकत नाही"; प्रणितची इन्स्टाग्राम पोस्ट




आपल्या नव्या शो 'घायल'चे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर करत प्रणित मोरेने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. प्रणितने लिहिले, "घायल. जे काही घडले ते मी बदलू शकत नाही, पण त्या प्रसंगाने मला कसा माणूस बनवले हे ठरवण्याचा अधिकार माझ्याकडे आहे. 'घायल' हीच माझ्या त्या संपूर्ण प्रवासाची कथा आहे. मुंबईपासून या शोची सुरुवात होत आहे."



समय रैनाची कॉपी केल्याचा आरोप


प्रणितच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. काही चाहत्यांनी त्याच्या कमबॅकचे स्वागत केले असले, तरी बहुतांश युझर्सने त्याच्यावर सडकून टीका केली आहे. अनेक युझर्सने त्याच्या या पुनरागमन शोची तुलना प्रसिद्ध कॉमेडियन समय रैना याच्याशी केली आहे. एका युझरने कमेंट करत लिहिले, "तू समय रैना नाहीस... त्याच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करू नकोस. एखादा वाद निर्माण करायचा, मग कमबॅक करायचे आणि लोकांनी सर्वकाही विसरून माफ करावे अशी अपेक्षा ठेवायची, हे आता थांबायला हवे." दुसऱ्या एका युझरने म्हटले, "सगळ्यांना आधीच ठाऊक होते की समयने जे केले, हा सुद्धा अगदी तसेच काहीतरी करणार." तर अन्य एका युझरने लिहिले, "त्याला वाटतेय की तो समयची थेट नक्कल करू शकतो."



काही चाहत्यांकडून मात्र भक्कम पाठिंबा


आलोचना आणि टीकेचा सामना करावा लागत असला तरी प्रणितच्या काही चाहत्यांनी त्याचे जोरदार समर्थन केले आहे. एका चाहत्याने कमेंट केली, "भाऊ, तुझी खूप आठवण येत होती. तुला पुन्हा मंचावर पाहून खूप आनंद झाला." तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, "अरे भावा! अखेर तू परत आलास. स्वतःची काळजी घे, आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे राहू. तुझ्यासारख्या सच्च्या कलाकाराचे चाहते असण्याचा आम्हाला अभिमान आहे."



नक्की काय होता ३७० रुपयांच्या 'बिर्याणी'चा वाद?


हा संपूर्ण वाद जून महिन्यात घडलेल्या प्रणितच्या एका 'क्राऊड-वर्क' (Crowd-work) शोदरम्यान सुरू झाला होता. शोमध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेल्या हिंमांशु जांगडा नावाच्या एका तरुणाने आपल्या डेटिंगचा किस्सा सांगताना दावा केला होता की, त्याने एका मुलीवर चिकन बिर्याणीसाठी ३७० रुपये खर्च केले होते आणि नंतर तिला घरी सोडण्याच्या मोबदल्यात ते पैसे वसूल करण्याची त्याची अपेक्षा होती. या संवादादरम्यान प्रणित मोरे प्रेक्षकांसोबत मोठ्याने हसला आणि त्याने या प्रसंगाला 'पीक गुडगाव कंटेंट' (Peak Gurgaon Content) म्हटले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलांबद्दलच्या अशा विधानांवर हसल्यामुळे प्रणितवर सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली.



पोलीस तक्रार आणि NCW ची दखल


वाद वाढल्यानंतर प्रणितने जाहीरपणे माफी मागितली होती आणि प्रेक्षकाच्या त्या चुकीच्या वक्तव्यावर हसणे ही आपली चूक होती, हे मान्य केले होते. मात्र, हा वाद केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित राहिला नाही. महिलांबद्दल आपत्तीजनक टिप्पणी केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांत एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला होता, तर राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) देखील या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली होती.

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी