Lock Upp 2 Winner : अँड द 'लॉक अप 2' ट्रॉफी गोज टू...; नाव ऐकताच मंचावर सन्नाटा

केवळ 7 मतांनी मारली बाजी! श्रेया कालराने जिंकली लॉक अप 2ची ट्रॉफी


मुंबई : 'लॉक अप 2' या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा ग्रँड फिनाले पार पडला असून, यंदाच्या पर्वाची विजेती म्हणून श्रेया कालराची घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण सीझनभर विविध टास्क, वाद, भावनिक क्षण आणि स्पर्धात्मक वातावरणानंतर अखेर श्रेयाने ट्रॉफीवर नाव कोरले. विजेतेपदासोबतच तिला 1 कोटी रुपयांचे बक्षीसही देण्यात आले. तर अभिनेत्री शिवांगी जोशीने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. ( Lock Upp 2)



ग्रँड फिनालेचे सूत्रसंचालन फराह खान (Farah Khan) आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांनी केले. विजेत्याची निवड जेलर, स्पर्धक आणि 'पब्लिक ज्युरी' यांच्या मतदानाच्या आधारे करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक गटाने आपल्या पसंतीच्या स्पर्धकाला मत दिल्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. ( Shreya Kalra)

अंतिम फेरीत श्रेया कालरा आणि शिवांगी जोशी यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. दोघींनाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. मात्र, अखेरीस केवळ 7 मतांच्या फरकाने श्रेयाने बाजी मारत 'लॉक अप 2'चे विजेतेपद पटकावले.



विजयानंतर ट्रॉफी स्वीकारताना श्रेया भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. या शोसाठी मानसिक, शारीरिक आणि भावनिक पातळीवर खूप मेहनत घेतल्याचे तिने सांगितले. मिळालेली 1 कोटी रुपयांची रक्कम तिच्यासाठी मोठा आधार ठरेल, असेही ती म्हणाली. यावेळी फराह खान यांनी हलक्याफुलक्या अंदाजात इतर स्पर्धकांच्या मानसिक आरोग्याबद्दल विचारले असता, "मी जिंकले तर सगळ्यांच्या थेरपीचा खर्च करेन," असे उत्तर देत श्रेयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ( Entainment News)

दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी श्रेया कालराच्या सातत्यपूर्ण खेळाचे कौतुक करत तिच्या विजयाचे स्वागत केले. तर दुसरीकडे, शिवांगी जोशीचे चाहतेही ती विजेतेपदासाठी तितकीच पात्र असल्याचे मत व्यक्त करताना दिसले. अनेक सोशल मीडिया युजर्सनी दोन्ही फायनलिस्टनी संपूर्ण सीझनमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याचे नमूद केले. (Lock Upp 2 Winner)

 
Comments
Add Comment

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार

Koffee with Karan: - "मेरे करण अर्जुन आएंगे..." निर्माता करण जोहर नवा चित्रपट आणण्याच्या तयारीत...

चित्रपट निर्माता करण जोहरयाने आजवर वेगवेगळ्या कार्यक्रमातून चाहत्याची मने जिंकली आहेत. आता करण जोहर 'कॉफी विथ