Jalgaon : जळगावच्या वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ? शहरातील चार ठिकाणी उड्डाणपूल आणि अंडरपास प्रस्तावाला नितीन गडकरींचा हिरवा कंदील

Jalgaon : जळगावकरांसाठी वाहतुकीबाबत एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरातील कायमस्वरूपी वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून चार महत्त्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल आणि व्हेईक्युलर अंडरपास (Flyover and Vehicular Underpass) उभारण्याच्या प्रस्तावाला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासदार स्मिता वाघ (MP Smita Wagh) यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांची भेट घेत जळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या आणि नागरिकांना होणारा त्रास याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी शहरासाठी महत्त्वाचा प्रस्ताव गडकरींसमोर मांडण्यात आला.



शहरातील 'या' उड्डाणपूल आणि अंडरपास


या प्रस्तावानुसार आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, अजिंठा चौफुली आणि नशिराबाद येथील महालक्ष्मी मंदिर मार्ग या चार ठिकाणी उड्डाणपूल किंवा व्हेईक्युलर अंडरपास (Flyover and Vehicular Underpass) उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या या चौकांवर सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामुळे नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, कामगार तसेच रुग्णवाहिकांसारख्या अत्यावश्यक सेवांनाही मोठा फटका बसत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळेही ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.



...तर जळगावच्या वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा


प्रस्तावित उड्डाणपूल आणि अंडरपास (Flyover and Vehicular Underpass)  उभारले गेल्यास शहरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक आणि शहरातील अंतर्गत वाहतूक स्वतंत्रपणे हाताळता येणार असल्याने वाहनांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुरळीत होईल. यासोबतच नागरिकांचा वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari)  यांनी या प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांना तांत्रिक पाहणी, वाहतूक सर्वेक्षण आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्याचे आश्वासन दिले आहे. व्यवहार्यता अहवाल आणि मंजुरीनंतर या प्रकल्पांना प्रत्यक्ष गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


आता जळगावकरांच्या नजरा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मंजुरीकडे लागल्या असून, हे उड्डाणपूल प्रत्यक्षात साकार झाले तर शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.