Attack on Mamata Banerjee : ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; गाडीवर चिखल, चप्पल, बूट फेकले

उत्तर २४ परगणा : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना उत्तर २४ परगणा जिल्ह्यात तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. एका मृत तृणमूल (TMC) कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जात असताना आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला घेरले. या वेळी आंदोलकांनी 'चोर-चोर'च्या घोषणा देत त्यांच्या गाडीवर चिखल फेकल्याचा आरोप आहे. ही घटना बीजपूर येथे घडली. मृत पक्ष कार्यकर्त्याच्या घरी जात असताना आंदोलकांच्या एका गटाने ममता बॅनर्जी यांच्या वाहनाला घेराव घातला.



माध्यमांशी बोलताना बॅनर्जी म्हणाल्या, "माझ्या गाडीवर दगड, शूज आणि चिखल फेकून हल्ला करण्यात आला आहे. हा पूर्णपणे एक कट आहे. मी येथे येत असल्याची पूर्वकल्पना पोलिसांना दिली होती; तरीही पोलिसांनी सुरक्षेच्या आवश्यक त्या कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. सध्या संपूर्ण पश्चिम बंगालवर गुंडांचे राज्य सुरू आहे."



बॅनर्जी या शांतताप्रिय भागात "शांतताभंग करण्यासाठी" आल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून, निदर्शनादरम्यान त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.हलीसहर पोलिसांच्या कोठडीत असताना प्रकृती बिघडल्याने या तृणमूल कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.



या प्रकरणी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी म्हणाले, "राज्यात कोणी माजी मुख्यमंत्र्यांच्या वाहनावर दगड, चिखल किंवा चप्पल फेकली, तर भाजप त्याचे समर्थन करत नाही. यात भाजपचा कोणताही कार्यकर्ता सामील नाही. राज्याच्या माजी महिला मुख्यमंत्र्यांसोबत असे वर्तन व्हावे, अशी आमची इच्छा नाही. असे घडल्यास भविष्यात पश्चिम बंगालचीच प्रतिमा मलीन होईल. आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि जर अशी घटना घडली असेल, तर पोलीस त्यावर त्वरित कारवाई करतील."

Comments
Add Comment

Solapur Crime News: आईला त्रास देत असल्याच्या रागातून भावानेच भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून; सोलापुरातील घटना

Solapur Crime News: सोलापूर शहरातील उमा नगरी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Nashik Accident : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात ! सिमेंट मिक्सरखाली चिरडून 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, या

Jain Diksha Mahotsav : प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार; अहिंसा आणि जीवदयेचा विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते. अहिंसा, त्याग, आत्मसंयम आणि जीवदया ही मूल्ये

RBI New Rules : ATMमधून वारंवार पैसे काढताय? वर्षाला 1,600 रुपयांहून अधिक शुल्क लागू शकते; RBIचा नवा नियम काय?

RBI New Rules :  एटीएममधून वारंवार पैसे काढणे किंवा बॅलन्स तपासणे यामुळे तुमचा बँकिंग खर्च वाढू शकतो. मोफत व्यवहारांची

Nashik : नाशिकमध्ये विनापरवाना परफ्यूम कारखान्यावर FDA चा छापा, 54 लाखांचा साठा जप्त

Nashik : नाशिकमध्ये विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.