Air India : एअर इंडियाचा कॅप्टन 'डोप टेस्ट'मध्ये दोषी ?

नवी दिल्ली :  थायलंडमधील फुकेतहून राजधानी दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या 'एअर इंडिया'च्या विमानात ४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत थरारक आणि घडकी भरवणारी घटना घडली. अचानक हवेचा वेग आणि दाब बदलल्यामुळे (टर्बुलेंस) हे विमान हवेतच तब्बल ३०० फूट खाली आले होते. या संपूर्ण घटनेनंतर, विमान दिल्लीत पोहोचल्यावर विमानाचे कॅप्टन अंमली पदार्थ (डोप) चाचणीत दोषी आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, विमान कंपनीने या वृत्ताला दुजोरा किंवा नकार दिलेला नाही. (Air India)



थायलंडमधील फुकेतहून ४ ऑगस्ट रोजी सकाळी ८:२५ च्या सुमारास १४५ प्रवाशांना घेऊन एअरबस ए३२० हे एअर इंडियाचे विमान (फ्लॅट क्रमांक) दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. नियोजित वेळेनुसार सकाळी ११:०७ च्या सुमारास ते दिल्लीत उतरणे अपेक्षित होते. विमान दिल्लीत उतरण्यापूर्वी ओडीसाजवळ आले असताना, 'टर्बुलेंस'मुळे विमानाला झटके बसले आणि ते एकाएकी ३०० फुट खाली आले. यामुळे विमानात प्रचंड भीती व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवाशांची आरडाओरड सुरू असतानाच वैमानिकाने मोठ्या कौशल्याने विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उत्तरवले. (Air India)



चाचणीवरून वाद :


एअर इंडियाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, "लागू नियमांनुसार वैमानिकांची उड्डाण-उत्तर चाचणी करण्यात आली होती. मात्र, याचे निकाल आमच्याशी सामायिक केलेले नसल्याने आम्ही यावर सध्यातरी भाष्य करू शकत नाही." डीजीसीएच्या नियमांनुसार, डोप चाचणीत पहिल्यांदा दोषी आढळल्यास वैमानिकाला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले जाते. दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास परवाना ३ वर्षांसाठी निलंबित होतो, तर तिसऱ्यांदा दोषी आढळल्यास परवाना कायमचा रद्द करण्याची कठोर तरतूद आहे. (Air India)

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने