Nashik Crime : नाशिकमार्गे पुण्याला जाणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक, वैध प्रवासी कागदपत्रे नसल्याचे चौकशीत उघड

Nashik Crime : बांगलादेशातून अवैध मार्गाने भारतात प्रवेश करून नाशिकमार्गे पुण्याला जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखा युनिट-२ने नाशिकरोड बसस्थानक परिसरातून जेरबंद केले. मोहम्मद साकीब मुल्ला (वय २२) आणि नाहीदा बादशाह मुल्ला (वय २१) अशी त्यांची नावे आहेत. (Nashik Crime News)



दोन बांगलादेशी नागरिकांना अटक


बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त, संदीप मिटके नाशिक शहर यांनी गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-२ (Crime Branch Unit-2) चे पोलीस अधिकारी व अंमलदार अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांची माहिती घेत असताना पो. हवलदार प्रदीप नन्नावरे व पो. अंमलदार संतोष सुपेकर यांना गुप्त माहिती मिळाली.


त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर (प्रभारी अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नाशिकरोड बसस्थानकातील पोलीस चौकीजवळ सापळा रचला. यावेळी मोहम्मद साकीब मुल्ला, रा. खुलता, जि. नराईल, राज्य खुलना, बांगलादेश आणि नाहीदा बादशाह मुल्ला, रा. सगोलसिरा, जि. नराईल, राज्य खुलना, बांगलादेश हे दोघे आढळून आले. चौकशीत त्यांच्याकडे कोणतीही वैध प्रवासी कागदपत्रे नसल्याचे समोर आले. तसेच त्यांनी भारत-बांगलादेश सीमेवरून अधिकृत परवानगीशिवाय अवैध मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. (Nashik Crime News)



नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


याप्रकरणी पोलीस अंमलदार संतोष सुपेकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नाशिकरोड पोलीस स्टेशनचे (Nashik Road Police Station) उपनिरीक्षक आहेर करीत आहेत.ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप गिरी, हेमंत तोडकर (प्रभारी अधिकारी), श्रेणी उप निरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवलदार प्रदीप नन्नावरे, पो.अंमलदार संतोष सुपेकर, मनोज शिंदे, प्रविण वानखेडे, जितेंद्र वजीरे तसेच नाशिकरोड दामिनी पथकाच्या सोनाली बागुल व ज्योती पवार यांनी केली.

Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास