Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

Mumbai Railway Megablock: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी उपनगरीय मार्गांवर 'मेगा ब्लॉक' घेण्यात येणार आहे.

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी उपनगरीय मार्गांवर 'मेगा ब्लॉक' घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान 5 व्या व 6 व्या मार्गिकेवर आणि हार्बर- ट्रान्स हार्बर लाईनवर पनवेल- वाशी स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान 5 व्या व 6 व्या मार्गिकेवर सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.



मध्य रेल्वे मार्गावर घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत, ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान खालील 'अप' दिशेकडील मेल/एक्सप्रेस गाड्या 'अप जलद' मार्गावरून वळवण्यात येतील. यामुळे या गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानी 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.




  • गाडी क्रमांक 22226 सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस

  • गाडी क्रमांक 11010 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस

  • गाडी क्रमांक 12124 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन एक्सप्रेस

  • गाडी क्रमांक 12126 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस

  • गाडी क्रमांक 12134 मंगळुरू - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

  • गाडी क्रमांक 13201 राजगीर - लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस

  • गाडी क्रमांक 17221 काकीनाडा पोर्ट - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

  • गाडी क्रमांक 12168 बनारस - लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस

  • गाडी क्रमांक 12321 हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मेल

  • गाडी क्रमांक 12812 हटिया - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

  • गाडी क्रमांक 11014 कोयंबटूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

  • गाडी क्रमांक 17611 नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस

  • गाडी क्रमांक 22160 चेन्नई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस



तर, ब्लॉक कालावधीत, ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान खालील 'डाउन' दिशेकडील मेल/एक्सप्रेस गाड्या 'डाउन जलद' मार्गावरून वळवण्यात येतील. यामुळे या गाड्या नियोजित वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटे उशिरा चालवण्यात येणार आहे.




  • गाडी क्रमांक 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कोल्हापूर कोयना एक्सप्रेस

  • गाडी क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपुर गोदान एक्सप्रेस

  • गाडी क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस - जयनगर एक्सप्रेस

  • गाडी क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस


मेमू सेवांचे शॉर्ट टर्मिनेशन/ ओरिजिनेशन


वसई रोड येथून सकाळी 09.50 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 61003 वसई रोड- दिवा मेमू गाडी कोपर स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. तर, दिवा येथून सकाळी 11.30 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 61004 दिवा- वसई रोड मेमू गाडी कोपर स्थानकावरून सकाळी 11.45 वाजता सुटेल. दिवा आणि कोपर स्थानकांदरम्यान ही मेमू सेवा रद्द राहील.



हार्बर लाईन


पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट लाईन वगळून) अप आणि डाऊन हार्बर लाईनवर सकाळी 11.05 ते सायंकाळी 04.05 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 03.49 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या अप हार्बर सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 09.45 ते दुपारी 03.12 या वेळेत बेलापूर/ पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर सेवा रद्द राहतील.




ट्रान्स-हार्बर लाईन


पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 03.53 या वेळेत ठाणे येथे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 03.20 या वेळेत पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- वाशी दरम्यान विशेष उपनगरीय रेल्वे सेवा चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत पोर्ट लाईनवरील सेवा सुरू राहतील. दरम्यान, पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल ब्लॉक आवश्यक आहेत. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी सुद्धा व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून