Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले निर्देश



मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱया विविध आरोग्य योजनांचा लाभ मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांना व्हावा, या उद्देशाने अधिक नियोजनबद्धरित्या प्रयत्न करावेत. दवाखाने, रूग्णालयातील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी केंद्रीय योजनांचा प्रभावीपणे वापर करावा. रुग्णांच्या सुविधेच्या अनुषंगाने केंद्रीय योजनांचा अधिक प्रचार व प्रसार करावा, असे निर्देश केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दिले. धर्मादाय रूग्णालयातील दुर्बल घटकांसाठी आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावावेत, असे निर्देश पुन्हा एकदा जाधव यांनी दिले.


सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील विविध केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेणारी बैठक केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री   प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी १३ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबई महानगरपालिका रूग्णालय पार पडली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. काही महिन्यांपूर्वी जाधव यांनी मुंबई महापालिकेत भेट देऊन मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला होता.



या प्रसंगी मुंबईच्या महापौर  रितू तावडे, उपमहापौर  संजय घाडी ,खासदार  रवींद्र वायकर, खासदार डॉ.  ज्योती वाघमारे, शिवसेना गटनेते अमेय घोले, सुधार समिती अध्यक्ष  संध्या दोषी सक्रे, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष  हरीश भांदिर्गे, एल प्रभाग समितीचे अध्यक्ष विजयेंद्र शिंदे, महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष  मीनल तुर्डे यांच्यासह विविध  नगरसेवक, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर)  प्राजक्ता वर्मा - लवंगारे, राज्य शासन आणि महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य खात्यातील विविध अधिकारी, अधिष्ठाता या बैठकीस उपस्थित होते.


या बैठकीत महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजना, एन ए सी ओ एफच्या माध्यमातून जेनेरिक औषध केंद्रे, ‘हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, महानगरपालिकेत प्रोटॉन थेरपी सेंटर, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गर्भाशय, स्तन व मुखाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी, सार्वजनिक खासगी भागिदारी तत्वावर आधारित ऊर्जा कार्यक्षमता प्रकल्प, अत्याधुनिक आयुष दवाखाना, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर महिलांसाठी मानसिक आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य निधी तसेच महानगरपालिका रुग्णालयांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र, सौरऊर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.



केंद्राच्या विविध योजनांची माहिती देणारे फलक रूग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्यात यावेत. तसेच धर्मादाय रूग्णालयाच्या ठिकाणी गरजू तसेच दुर्बल घटकांसाठी आरक्षित असणाऱ्या रूग्णशय्यांबाबतची माहिती ठळकपणे दर्शनी भागात प्रदर्शित करणारे फलक लावावेत, असे निर्देश केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या प्रमुख रूग्णालयाच्या ठिकाणी जनऔषधी केंद्रासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.


महापौर  रितू तावडे म्हणाल्या की, आयुष्मान कार्डधारक रुग्णांना वैद्यकीय सेवा देताना इतर कोणतेही कागदपत्रे सादर करण्याची सक्ती न करता त्यांना वैद्यकीय सेवा व उपचार पुरवावेत. या निर्देशाची  महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये तत्काळ अंमलबजावणी करावी.


केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱया तसेच केंद्र शासनाकडून तांत्रिक व आर्थिक सहाय्य मिळणाऱ्या सर्व आरोग्य सेवांचा लाभ थेट आर्थिकदृष्ट्या गरजू जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा राज्यमंत्री जाधव यांनी व्यक्त केली. तसेच केंद्र शासनाकडून उपलब्ध होणारा जास्तीत जास्त निधी महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रासाठी प्राप्त करून त्याचा प्रभावी व वेळेत विनियोग व्हावा, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आवाहन  जाधव यांनी केले.
Comments
Add Comment

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर