National Sports Awards 2025 : यंदाचा 'खेळरत्न' पुरस्कार हुकला! दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंना 'अर्जुन पुरस्कार' घोषित

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५' National Sports Awards 2025) ची घोषणा अखेर केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. यंदा देशभरातील १७ नामांकित खेळाडूंना प्रतिष्ठित 'अर्जुन पुरस्कार' देऊन सन्मानित केले जाणार आहे. मात्र, यंदाचा सर्वात मोठा धक्का म्हणजे देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मानला जाणारा 'मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार' (Khel Ratna) एकाही खेळाडूला देण्यात आलेला नाही. यापूर्वी २०१४ मध्ये अशा प्रकारे खेळरत्न पुरस्कारासाठी एकाही खेळाडूची निवड झाली नव्हती.



पुरस्कार घोषणेला विलंब


सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने दिलेल्या शिफारशींच्या आधारे पुरस्कारार्थींची नावे निश्चित करण्यात आली आहेत. सुरुवातीला हॉकीपटू हार्दिक सिंग याचे नाव खेळरत्न पुरस्कारासाठी चर्चेत होते, मात्र नंतर त्याला अंतिम यादीत स्थान मिळाले नाही. १९९१ मध्ये पुरस्कार सुरू झाल्यापासून यंदाच्या वर्षी विजेत्यांच्या नावांची घोषणा होण्यास सर्वात मोठा विलंब झाला आहे. योग्य आणि पात्र खेळाडूंचीच निवड व्हावी आणि पुरस्कारांचे गांभीर्य व पारदर्शकता टिकून राहावी, यासाठी क्रीडा मंत्रालयाकडून पुनर्मूल्यांकन करण्यात आल्यामुळे हा विलंब झाल्याचे सांगण्यात आले आहे.



१७ खेळाडूंना 'अर्जुन पुरस्कार'


निवड समितीने सुरुवातीला २४ खेळाडूंच्या नावांची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी केली होती, परंतु मंत्रालयाने त्यातील १७ नावांनाच मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे २०२३ मध्ये गोलंदाज मोहम्मद शमीला मिळालेल्या बहुमानानंतर यंदाही एकाही पुरुष किंवा महिला क्रिकेटपटूचा या यादीत समावेश झालेला नाही. मागील चार वर्षांतील सातत्यपूर्ण कामगिरी, क्रीडावृत्ती, शिस्त आणि नेतृत्वगुण या निकषांवर आधारित हे पुरस्कार प्रदान केले जातात.



दिव्या देशमुख आणि तेजस्विन शंकरची चमकदार कामगिरी


पुरस्कार विजेत्यांमध्ये ग्रँडमास्टर दिव्या देशमुख, डेकॅथलॉनपटू तेजस्विन शंकर आणि बॅडमिंटनपटू गायत्री गोपीचंद यांच्यासह इतर अनेक प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. १९ वर्षीय दिव्या देशमुखने गेल्या वर्षी जॉर्जियातील बटुमी येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवत देशातील चौथी महिला ग्रँडमास्टर बनण्याचा मान मिळवला होता. दुसरीकडे, तेजस्विन शंकरने नुकत्याच ग्लास्गो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत डेकॅथलॉन प्रकारात ऐतिहासिक कांस्यपदक जिंकून भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.



'दोन प्रकारांतील' अर्जुन, द्रोणाचार्य आणि जीवनगौरव पुरस्कार विजेत्यांची पूर्ण यादी


अर्जुन पुरस्कार (१७ विजेते): तेजस्विन शंकर (अ‍ॅथलेटिक्स), प्रियंका गोस्वामी (अ‍ॅथलेटिक्स), नरेंद्र (बॉक्सिंग), विदित गुजराथी (बुद्धिबळ), दिव्या देशमुख (बुद्धिबळ), धनुष श्रीकांत (बधिर नेमबाजी), राजकुमार पाल (हॉकी), सुरजित (कबड्डी), रुद्रांश खंडेलवाल (पॅरा-नेमबाजी), एकता भयान (पॅरा-अ‍ॅथलेटिक्स), अरविंद सिंग (रोइंग), अखिल शेवरॉन (नेमबाजी), ट्रीसा जॉली (बॅडमिंटन), गायत्री गोपीचंद (बॅडमिंटन), लालरेमसियामी (हॉकी), मोहम्मद अजमल (अ‍ॅथलेटिक्स), पूजा (कबड्डी).


अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) : आय. अरुमायनायगम (फुटबॉल - १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य).


द्रोणाचार्य पुरस्कार (उत्कृष्ट प्रशिक्षक) : परवीर सिंग, छोटे लाल यादव (मॅरी कॉम यांचे प्रशिक्षक), नेहा चव्हाण.


द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव) : धर्मेंद्र यादव (पुरुष राष्ट्रीय बॉक्सिंग संघ प्रशिक्षक), वीरेंद्र कुमार (कुस्ती प्रशिक्षक).

Comments
Add Comment

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नक्षलग्रस्त भागातील नागरिक विशेष अतिथी म्हणून सहभागी; शांतता, विकास आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिला संदेश

गोंदिया: भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त

Narendra Modi: एकता नगरचे भव्य वर्षावन; बाराही महिने मान्सूनचा अनुभव आणि काचेचा स्कायवॉक

[caption id="attachment_1070988" align="aligncenter" width="800"] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच गुजरात मधील एकता नगर (केवडिया) येथे एका भव्य आणि

लडाखमध्ये 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा, मुख्य सचिव आशिष कुंद्रा यांनी नागरिकांना 'एकता दिवस'ची दिली शपथ

[caption id="attachment_1070982" align="aligncenter" width="800"] लेह, लदाख मध्ये 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा करण्यात आला. लडाखच्या केंद्रशासित प्रदेश

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली महाराष्ट्र पर्यटन दालनाला भेट; पैठणीच्या कलाकुसरीचे केले कौतुक

गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्व २०२६ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष

Ashutosh Dixit : एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; 43 वर्षांच्या सेवेनंतर ए. पी. सिंह निवृत्त

Defence News: एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी शनिवारी भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. तब्बल 43

उत्तराखंड रन फॉर युनिटी आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींच्या घोषणा; पीआरडी जवानांचे मानधन वाढणार, प्रत्येक ग्रामपंचायतीत क्रीडा क्लब!

[caption id="attachment_1070936" align="aligncenter" width="800"] राष्ट्रीय एकता दिनानिमित्त देहरादून येथील पॅव्हेलियन ग्राउंडवर ‘रन फॉर युनिटी’ या