Waste to Best : मक्याच्या टाकाऊ सालींपासून बनवा घरासाठी 'या' अप्रतिम वस्तू; स्मार्ट गृहिणींचा हा भन्नाट जुगाड
August 19, 2026 07:55 PM
Waste to Best : पावसाळ्यात प्रत्येकाला मक्याचे कणीस खायला आवडते. बाजारातून आई सुध्दा मक्के आणत असते. पण मका खाल्ल्यानंतर, आपण अनेकदा त्याची टरफले निरुपयोगी समजून फेकून देतो. विशेषतः एकाच कणसाला बरीच टरफले येत असल्यामुळे, ती घराभोवती मोठ्या प्रमाणात साठत जातात आणि अनेक जण ती कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून देतात. जर तुम्हीही असेच करत असाल, तर थांबा. मक्याची टरफले केवळ कचरा नसून, ती खूप उपयुक्त आहेत. तर चला जाणून घेऊयात त्याचे फायदे....
कंपोस्टसाठी उपयोगी
मक्याच्या सालींचे बारीक तुकडे करून कंपोस्टमध्ये टाका. इतर ओल्या आणि सुक्या सेंद्रिय कचऱ्यासोबत त्यांचे विघटन होऊन कंपोस्ट तयार करण्यास मदत होते.
इडली, मोदक, ढोकळा यांसारखे पदार्थ वाफवताना स्वच्छ मक्याची साले आधार म्हणून वापरता येतात. त्यामुळे पदार्थ थेट प्लेटला चिकटण्यापासून काही प्रमाणात मदत होऊ शकते.
घराची सजावट
वाळलेल्या मक्याच्या सालींपासून कृत्रिम फुले, छोट्या सजावटीच्या वस्तू, कोस्टर किंवा वॉल हँगिंग तयार करता येतात. थोडी कल्पकता वापरली तर कचऱ्यापासून सुंदर डेकोरेशन तयार होऊ शकते.
पॅकिंग
काचेच्या किंवा नाजूक वस्तू ठेवताना वाळलेल्या सालींचा हलका कुशनिंग मटेरियल म्हणून वापर करता येतो. त्यामुळे पॅकिंगसाठी लागणाऱ्या इतर साहित्याची बचत होऊ शकते.
टोपल्या आणि चटया
वाळलेल्या सालींना थोडे ओले करून मऊ केले, तर त्यांच्यापासून छोट्या टोपल्या, मॅट्स किंवा इतर हस्तकला वस्तू विणता येतात.
नैसर्गिक हस्तकलेसाठी तंतू
मक्याच्या सालींमधील बारीक तंतू आणि धाग्यांचा वापर विविध क्राफ्ट प्रोजेक्टमध्ये करता येतो. मुलांसोबतही यापासून साध्या पर्यावरणपूरक हस्तकला वस्तू तयार करता येतील.