Govinda And Sunita Ahuja : सुनीता आहुजा फॅमिली कोर्टाबाहेर? सुखी संसारात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री

मुंबई : अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून विविध चर्चा सुरू आहेत. दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे दावे तसेच गोविंदाच्या कथित अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. अशातच सुनीता आहुजा मुलगा यशवर्धन आहुजासोबत मुंबईतील फॅमिली कोर्टाबाहेर दिसल्याने या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. (Govinda)


समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सुनीता आणि यशवर्धन कोर्टाच्या बाहेर दिसत आहेत. दोघेही काहीसे चिंतेत असल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. मात्र, सुनीता फॅमिली कोर्टात नेमक्या कोणत्या कारणासाठी गेल्या होत्या, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे त्या घटस्फोटाच्या प्रक्रियेसाठी कोर्टात गेल्या होत्या का, याबाबत केवळ चर्चा सुरू आहे. (Sunita Ahuja)



काही दिवसांपूर्वी गोविंदा राणी स्वर्णकार नावाच्या अभिनेत्रीसोबत विमानतळावर दिसले होते. त्यानंतर सोशल मीडियावर राणी ही गोविंदाची कथित गर्लफ्रेंड असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चांवर सुनीता यांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी गोविंदावर टीका करत काही वक्तव्ये केली होती. त्यामुळे दोघांच्या नात्यात खरोखरच काही अडचणी आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. (Bollywood News)


दरम्यान, गोविंदा आणि सुनीता यांनी 11 मार्च 1987 रोजी लग्न केले. या जोडप्याला टीना आणि यशवर्धन अशी दोन मुले आहेत. बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही काळातील विविध दावे आणि सुनीता यांची वक्तव्ये यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत चर्चा सुरू आहे. (Family Court)


आता सुनीता आहुजा फॅमिली कोर्टाबाहेर दिसल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. मात्र, त्या कोर्टात नेमक्या कोणत्या कारणासाठी गेल्या होत्या, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे गोविंदा आणि सुनीता यांच्या 39 वर्षांच्या वैवाहिक नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना सध्या अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. (Entertainment News)


Comments
Add Comment

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार

Koffee with Karan: - "मेरे करण अर्जुन आएंगे..." निर्माता करण जोहर नवा चित्रपट आणण्याच्या तयारीत...

चित्रपट निर्माता करण जोहरयाने आजवर वेगवेगळ्या कार्यक्रमातून चाहत्याची मने जिंकली आहेत. आता करण जोहर 'कॉफी विथ