Pune Crime : 'आधी तुझे अर्धनग्न फोटो पाठव, मग...'; 23 वर्षांच्या भोंदू बाबाचा धक्कादायक कारनामा उघड

पुणे : पुण्यातील कोंढवा (Kondawa) परिसरात स्वतःला अध्यात्मिक गुरु सांगणाऱ्या एका तरुणाने नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याच्या नावाखाली 22 वर्षीय तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी दिव्य जितेंद्र परमार (वय 23, रा. पार्श्वनगर सोसायटी, कोंढवा बुद्रुक) याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात विनयभंग तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Pune Crime)


पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी परिसरातील महिला आणि तरुणींना व्यायामासंदर्भात विविध टिप्स देत होता. याच माध्यमातून 22 वर्षीय तरुणीची त्याच्याशी ओळख झाली. काही काळ संपर्कात राहिल्यानंतर आरोपीने तरुणीच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा असल्याचा दावा केला. ही ऊर्जा बाहेर काढण्यासाठी काही विशिष्ट शारीरिक हालचाली करणे गरजेचे असल्याचे त्याने तिला सांगितले. (Kondhwa Police)



यानंतर आरोपीने तरुणीला वेगवेगळ्या प्रकारे घाबरवण्यास सुरुवात केली. नकारात्मक ऊर्जा काढण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याकडे अर्धनग्न फोटो पाठवण्याची मागणी केली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आणि भीतीपोटी तरुणीने त्याला मोबाईलवरून फोटो पाठवले. (Pune News)


मात्र, काही काळानंतर तरुणीला आरोपीच्या वागण्याचा संशय आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. (Crime)


या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत. आरोपीने अशाच प्रकारे इतर महिला किंवा तरुणींना आपल्या जाळ्यात ओढले आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. अशा प्रकारे अंधश्रद्धेच्या नावाखाली कोणी वैयक्तिक फोटो किंवा अन्य माहिती मागत असल्यास नागरिकांनी सावध राहून तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Pune)


Comments
Add Comment

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

मंत्रोच्चाराच्या घोषात त्र्यंबकेश्वर येथे विधिवत ध्वजस्तंभ पूजन, 31 फूट उंच भव्य ध्वजस्तंभाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन; पाहा खास क्षण

[caption id="attachment_1066607" align="aligncenter" width="800"] त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विधिवत

सचिन सानप शिवसेनेचा उमेदवार नाही! उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत समन्वयाचा अभाव दिसत असताना, उद्योगमंत्री उदय सामंत

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

Gold Rate Today : आनंदाची बातमी ! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे भावही उतरले

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून