Upcoming Reality Shows : सलमान - माधुरीसह प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणखी ३ कलाकारांचा रिअॅलिटी शोच्या माध्यमातून कमबॅक

मुंबई : १९६५ ते १९७० या काळात जन्मलेल्या ‘झेन एक्स’ पिढीतील अनेक सेलिब्रिटींनी ‘मिलेनियल्स’चे चित्रपट, मालिका आणि संगीताच्या माध्यमातून मनोरंजन केले. आता हेच लोकप्रिय चेहरे रिअॅलिटी शोच्या माध्यमातून ‘झेन झी’ पिढीचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. (Upcoming Reality Shows)



कोण आहेत हे सेलिब्रिटी ?


पाहिलं नाव आहे माधुरी दीक्षित. तिने आपल्या अभिनय आणि नृत्याने अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. आता ही सर्वांची लाडकी ‘धकधक गर्ल’ ‘कोण होणार करोडपती’ या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. शोची नोंदणी सुरू झाली असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Upcoming Reality Shows)



दुसरं नाव आहे सलमान खान. सलमान गेल्या अनेक वर्षांपासून ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालन करत आहे. आता तो ‘बिग बॉस २०’ घेऊन येत असून हा शो ६ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे.


मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय आदेश बांदेकर म्हणजेच महाराष्ट्राचे ‘भावोजी’ ‘होम मिनिस्टर’मुळे म्हणून घराघरात पोहोचले. २०२४ मध्ये बंद झालेला हा शो तब्बल दोन वर्षांनंतर ३१ ऑगस्ट २०२६ पासून पुन्हा सुरू होणार आहे.


या सगळ्यांसोबतच एक डबल धमाकाही प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. संगीतविश्वातील धुरंधर अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी ‘सारेगमप’च्या अनेक पर्वांमध्ये परीक्षकाची भूमिका बजावली आहे. आता दोघेही नव्या पर्वासह पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ‘सारेगमप’चा नवा सीझन २२ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होत आहे. (Upcoming Reality Shows)


अशाप्रकारे जुन्या पिढीच्या मनावर अधिराज्य गाजवणे हे लोकप्रिय चेहरे आता नव्या पिढीलाही रिअॅलिटी शोच्या माध्यमातून आकर्षित करण्यासाठी नव्या उमेदीनं सज्ज झाले आहेत. (Upcoming Reality Shows)

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी