Kareena Kapoor Pregnancy : करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? नणंद सबा पटौदीने अखेर मौन सोडलं

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या कथित तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच करीनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तिचे पोट थोडे वाढलेले दिसल्याने ती पुन्हा आई होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, आता तिची नणंद सबा पटौदी यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. (Kareena Kapoor)


सबा पटौदी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर करीनाचा जिमबाहेरील फोटो शेअर केला. या फोटोसोबत त्यांनी करीनाच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या चुकीच्या आणि निराधार असल्याचे स्पष्ट केले. केवळ फोटोचा अँगल किंवा एखाद्या दिवशीचा लूक पाहून एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले. (Kareena kapoor Pregnancy)



सबा यांनी लिहिले की, एखादा फोटो खराब अँगलमधून आला किंवा हेअर डे चांगला नसला म्हणून लोक थेट निष्कर्षापर्यंत कसे पोहोचू शकतात? करीनाला यापूर्वी एअरपोर्टवर स्लिम आणि स्टायलिश लूकमध्ये पाहिले गेले होते आणि आता ती जिमबाहेर दिसली आहे. त्यामुळे केवळ एका फोटोवरून तिच्या प्रेग्नन्सीचा अंदाज लावणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. (Viral News)



"काश ही बातमी खरी असती..."


सबा यांनी आपल्या पोस्टमध्ये बहिण सोहा अली खान हिला दुसऱ्या मुलासाठी राजी करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही मजेशीरपणे सांगितले. "काश ही बातमी खरी असती," असे म्हणत त्यांनी करीनाच्या तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांवर विनोदी अंदाजात प्रतिक्रिया दिली. Celebrity News)


तसेच, इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात विनाकारण ढवळाढवळ करू नका, असा संदेशही सबा यांनी दिला. "जगा आणि जगू द्या. काही गोष्टी वैयक्तिकच राहू द्या," असा सल्ला त्यांनी दिला.


करीना आणि  सैफ अली खान (Saif Ali Khan) यांनी 2012 मध्ये लग्न केले. या दाम्पत्याला तैमूर आणि जेह अशी दोन मुले आहेत. 2016 मध्ये तैमूरचा, तर 2021 मध्ये जेहचा जन्म झाला. त्यामुळे सध्या करीना तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना सबा पटौदी यांच्या स्पष्टीकरणामुळे पूर्णविराम मिळाला आहे. ( Pregnancy Rumours)

Comments
Add Comment

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार

Koffee with Karan: - "मेरे करण अर्जुन आएंगे..." निर्माता करण जोहर नवा चित्रपट आणण्याच्या तयारीत...

चित्रपट निर्माता करण जोहरयाने आजवर वेगवेगळ्या कार्यक्रमातून चाहत्याची मने जिंकली आहेत. आता करण जोहर 'कॉफी विथ

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरात वातावरण तापलं! नकुलसाठी आसिफवर चिडली लव्ह; यंग आणि स्काऊटमध्ये सुद्धा बाचाबाची

Bigg Boss 20 च्या घरात नेहमीच काहीना काही रंजक गोष्टी घडत असतात. अनेकदा स्पर्धकांमध्ये भांडणं होतात. कधी कधी तर ही भांडणं