Nashik Crime : नाशिकमध्ये चाललंय काय ? रविवार कारंजावर टवाळखोरांचा धुमाकूळ, रिक्षाचालकाला अडवून थेट...

Nashik Crime : नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असं नाशिक पोलीस गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून वदवून घेत असले तरी नाशिकची गुन्हेगारी 'जैसे थेच' असल्याचं चित्र आहे, हे गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या घटनांतून स्पष्ट दिसत आहे. आता पुन्हा एकदा नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात टवाळखोरांचा धुमाकूळ पहायला मिळाला आहे. शहरातील गजबजलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रविवार कारंजा (Ravivar Karanja) परिसरातील चांदीचा गणपती मंदिरासमोर शनिवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास टवाळखोरांनी प्रवाशांना सोडून घरी परतणाऱ्या एका ५६ वर्षीय रिक्षाचालकाला विनाकारण अडवून, शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. (Nashik Crime News)



रिक्षाचालक गंभीर जखमी


धक्कादायक म्हणजे एवढ्यावरच न थांबता या टवाळखोरांनी दगड उचलून चालकाच्या पाठीवर आणि कानाखाली मारून गंभीर दुखापत केली आहे. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा मद्यधुंद व टवाळखोर तरुणांच्या गुंडगिरीचा प्रश्न समाेर आला आहे. ​इंदिरानगर (Indiranagar) येथील रहिवासी अल्ताफ मेहबूब खान (वय ५६) यांच्यासोबत हा सर्व थरार घडला आहे. अल्ताफ मेहबूब खान हे ऑटो रिक्षाने प्रवाशांना रविवार कारंजा (Ravivar Karanja) येथे सोडून घरी परतत होते. यावेळी 'चांदीचा गणपती' मंदिरासमोरील ('Chandicha Ganesha' Temple) मुख्य रस्त्यावर आले असता, एका दुचाकीवरून (क्रमांक MH 15 KT 9649) आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी त्यांची रिक्षा अडवली. रिक्षाचालकाने वाद टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न केला मात्र, संशयितांनी पुन्हा रिक्षासमोर येत त्यांना खाली उतरवले आणि शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. (Nashik Crime News)



सरकारवाडा वाडा पोलिसांत गुन्हा


यातील एका उंच, सडपातळ बांध्याच्या व राखाडी रंगाचा शर्ट घातलेल्या तरुणाने रस्त्यावर पडलेला दगड उचलून खान यांच्या पाठीवर जोरदार वार केला. तसेच डाव्या कानाच्या खाली मारहाण करून त्यांना गंभीर (Injured) जखमी केले. ​घटनेनंतर जखमी रिक्षाचालक अल्ताफ खान यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) धाव घेऊन तक्रार नोंदवली असून त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ​संशयित वापरत असलेल्या दुचाकीच्या (MH 15 KT 9649) नंबरवरून पोलीस माग काढत आहेत. हवालदार बागुल (Sarkarwada Police Station) तपास करत आहेत.


Comments
Add Comment

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी