Ahilyanagar : पत्रकारावर जीवघेणा हल्ला, छत्रपती संभाजीनगरातून तिघे ताब्यात

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहरातील पत्रकार सुशील थोरात आणि त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर परिसरातून ताब्यात घेतले. हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक (वय २७, रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर), महेश उर्फ पप्पू दशरथ मते (वय २७, रा. सावेडी, अहिल्यानगर), प्रशांत शिवाजी निक्रड (वय २५, रा. सावेडी, अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. (Ahilyanagar Crime News)



नेमकं काय घडलं ?


20 ऑगस्ट रोजी पत्रकार सुशील थोरात यांच्या कारला सोनू कोहक याने दुचाकीने धडक दिली होती. यावरून दोघांमध्ये वाद झाला. तसेच थोरात यांनी संशयितांविरोधात बातम्या प्रसिद्ध केल्याचा राग मनात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या वादानंतर सोनू कोहक, पप्पू मते, विकी ढवण, प्रशांत निक्रड आणि एका अनोळखी व्यक्तीने थोरात व त्यांच्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर संशयित पसार झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला संशयितांचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दोन स्वतंत्र पथके तयार केली. (Ahilyanagar Crime News)



छत्रपती संभाजीनगरातून तिघे ताब्यात


पोलिसांनी बातमीदारांकडून मिळालेली माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान 24 ऑगस्ट रोजी हेमंत कोहक हा त्याच्या साथीदारांसह छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील वाळुंज एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचून हेमंत कोहक, महेश मते आणि प्रशांत निक्रड या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी पत्रकार थोरात आणि त्यांच्या मुलाला मारहाण केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हेमंत कोहक आणि प्रशांत निक्रड हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू असून, पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. (Ahilyanagar Crime News)



आरोपी सराईत गुन्हेगार


दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी सोनू कोहक व प्रशांत निक्रड हे सराईत गुन्हेगार आहेत. सोनू कोहकवर यापूर्वी तोफखाना पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. तर, प्रशांत निक्रडवरही गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे.

Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास