Nashik Crime : 'ती' नव्हे तर फोनवरची व्यक्ती तृतीयपंथी निघाली, मॅट्रिमोनिअल ॲपवर डॉक्टरला11.86 लाखांचा गंडा, AI व्हॉईसच्या मदतीने...

Nashik Crime : नाशिकमध्ये मॅट्रिमोनिअल ॲपच्या माध्यमातून डॉक्टरची तब्बल ११ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉ. सायली पाटील या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून एका नामांकित डॉक्टरला जाळ्यात ओढणारा संशयित संकेत चव्हाण हा २५ वर्षीय तृतीयपंथी असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.



नेमकं प्रकरण काय ?


लग्नासाठी मॅट्रिमोनिअल ॲपवर नोंदणी केलेल्या डॉक्टरची ‘डॉ. सायली पाटील’ या नावाच्या प्रोफाइलशी ओळख झाली. संशयित संकेत चव्हाण हा AI व्हॉईस चेंजरच्या मदतीने महिलेचा हुबेहूब आवाज तयार करून डॉक्टरशी संवाद साधत होता. त्यासोबतच तरुणीचे आकर्षक फोटो पाठवून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. नाशिकमधील तीन ते चार नामांकित डॉक्टर आपले नातेवाईक असल्याचे सांगत संशयिताने डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबाचा विश्वास आणखी दृढ केला. प्रत्यक्ष भेट मात्र सातत्याने टाळण्यात आली आणि मोबाईलवरूनच लग्नाची बोलणी सुरू ठेवण्यात आली. (Nashik Crime News)



अंबड पोलिस ठाण्यात तक्रार


१३ जून ते २२ ऑगस्टदरम्यान लग्नाची तयारी, कपडे, दागिने तसेच तातडीच्या आर्थिक गरजा अशी वेगवेगळी कारणे सांगून डॉक्टरकडून ऑनलाइन पैसे उकळण्यात आले. एवढेच नाही तर एटीएम कार्डही हस्तगत करण्यात आले. अशा प्रकारे डॉक्टरची तब्बल ११ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरने अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुरुवातीला डॉ. सायली पाटील, तिचा कथित भाऊ लोकेश, सेवानिवृत्त काका आणि मनमत देसले अशा चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. (Nashik Crime News)



सॅनिटायझर पिऊन पोलिसांवर दबाव


वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश नडविनकेरी यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि CDRच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावला. तपासात ‘डॉ. सायली पाटील’ या नावामागे संकेत चव्हाण असल्याचे समोर आले आणि त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही संकेतने आजारपणाचा बनाव करत पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. त्याने सॅनिटायझर पिण्याचाही प्रयत्न केला. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी त्याला रीतसर अटक केली. संशयिताने याच पद्धतीने आणखी किती जणांना जाळ्यात ओढले आहे, या फसवणुकीत आणखी कोणाचा सहभाग आहे आणि उकळलेली ११ लाख ८६ हजार रुपयांची रक्कम कुठे वापरली, याचा तपास अंबड पोलिसांकडून सुरू आहे. (Nashik Crime News)

Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास