Kuku Kohli Dies : चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन; अश्रूधाल्या डोळ्यांनी अरुणा इराणींचा निरोप, बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणला (Ajay Devgan) 'फूल और कांटे' चित्रपटातून पहिला ब्रेक देणारे कुकू कोहली यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी, २५ ऑगस्ट रोजी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी (Kokilaben Dhirubhai Ambani Hospital) रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.



अरुणा इराणी भावुक, कुटुंबासह मित्रांची उपस्थिती


दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli)  यांची अंतिम यात्रा बुधवारी सकाळी १० च्या सुमारास अंधेरी वेस्ट येथील त्यांच्या 'ग्रीन एकर्स' या निवासस्थानावरून निघाली. दुपारी १२ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. पतीच्या निधनाने खचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांना अंतिम निरोप देताना अश्रू अनावर झाले होते. कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या नातेवाईकांनी त्यांना सावरले. त्याआधी सकाळी ९:३० वाजता त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती त्यांचे मित्र आणि दिग्दर्शक अशोक पंडित यांनी दिली.



बॉलिवूडकरांची स्मशानभूमीत गर्दी


कुकू कोहली यांच्या अंतिम प्रवासात चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. स्मशानभूमीत दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेता विकी कौशल, स्टंट डायरेक्टर शाम कौशल आणि अशोक पंडित यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दिवंगत दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहिली.



अखेरच्या क्षणी काय घडले ?


सोमवारी, २४ ऑगस्ट रोजी प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने कुकू कोहली यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अरुणा इराणी यांचे भाऊ बलराज इराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कुकूजी अगदी ठणठणीत होते, पण संध्याकाळी त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ते आमच्याशी गप्पा मारत असतानाच अचानक खाली कोसळले." डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र संध्याकाळी ५ च्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले.



अजय देवगण भावुक; गुरुच्या आठवणीत वाहिली श्रद्धांजली


अजय देवगणसाठी कुकू कोहली हे केवळ पहिले दिग्दर्शक नव्हते, तर त्याच्या कारकिर्दीला आकार देणारे मार्गदर्शक होते. १९९१ मध्ये 'फूल और कांटे' या सुपरहिट चित्रपटातून त्यांनी अजयला बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. आपल्या गुरुच्या निधनानंतर अजयने सोशल मीडियावर लिहिले, "काही व्यक्ती तुमच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकतात. कुकूजी माझ्यासाठी तसेच होते. त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी कायम ऋणी राहीन. तुमची खूप आठवण येईल कुकूजी. ॐ शांती."



९० च्या दशकातील यशस्वी दिग्दर्शक


'अवतार कोहली' हे नाव असलेल्या कुकू कोहली यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यांनी १९७१ मध्ये राज कपूर यांच्या 'मेरा नाम जोकर' या अजरामर चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९९१ मध्ये 'फूल और कांटे' द्वारे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. त्यानंतर त्यांनी 'कोहराम' आणि १९९४ मध्ये 'सुहाग' सारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले. 'सुहाग' चित्रपटातूनच अजय देवगण आणि अक्षय कुमार ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसली होती. २००४ मध्ये प्रदर्शित झालेला 'वो तेरा नाम था' हा त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट होता. कुकू कोहली यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी, तसेच पहिल्या पत्नी रीता कोहली यांच्यापासून झालेल्या दोन मुली पूजा आणि करिश्मा असा परिवार आहे.

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या