Salman Khan : रोमँटिक हिरो ते ‘भाई’! सलमान खानच्या ३८ वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास

एक अभिनेता ज्याने जवळपास चार दशकं बॉलिवूड गाजवलं, अनेक चढ-उतार अनुभवले आणि तरीही त्याचं नाव ऐकताच थिएटरमध्ये टाळ्यांचा आवाज घुमतो… हा प्रवास आहे अभिनेता सलमान खानचा! २६ ऑगस्ट २०२६ रोजी सलमान खान फिल्म्सने त्याच्या बॉलिवूडमधील ३८ वर्षांच्या प्रवासाला खास व्हिडिओद्वारे उजाळा दिला. सलमानने १९८८ मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’मधून पदार्पण केलं. पण खरी ओळख मिळाली ती १९८९ मधील ‘मैने प्यार किया’मधून. रोमँटिक भूमिकेतला हा तरुण अभिनेता पाहता पाहता देशाचा ‘भाई’ बनला. (Salman Khan)


त्यानंतरचा प्रवास मात्र एका इमेजमध्ये अडकू दिला नाही. ‘हम आपके हैं कौन..!’, ‘करण अर्जुन’, ‘हम दिल दे चुके सनम’मधून तो रोमँटिक हिरो म्हणून तरुणींच्या मनात घर करून गेला. तर ‘वॉन्टेड’ आणि ‘दबंग’मधून अॅक्शन स्टार म्हणून घराघरात पोहोचला. त्यानंतर ‘बजरंगी भाईजान’ व ‘सुलतान’मधून त्याने आपल्या अभिनयाची वेगळी छटा उमटवली.



सलमान खान अनेकदा त्याच्या अभिनयासोबतच काही वादांमुळेही चर्चेत राहिला. काळवीट शिकार प्रकरण, 2002 चं हिट-अँड-रन प्रकरण, ऐश्वर्या रायसोबतचा वाद, विवेक ओबेरॉय पत्रकार परिषद वाद आणि ‘बिग बॉस’शी संबंधित अनेक प्रसंग त्याच्या नावाशी जोडले गेले. (Salman Khan)


मात्र या वादांसोबतच 'Being Human Foundation'च्या माध्यमातून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील सामाजिक उपक्रमही त्याच्या सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाचा भाग राहिले. टेलिव्हिजनवर ‘बिग बॉस’च्या माध्यमातून त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि मोठ्या पडद्यावर आजही त्याची वाटचाल सुरूच आहे.
आता त्याचा आगामी अॅक्शन चित्रपट ‘मॉन्स्टर’ चर्चेत आहे.


३८ वर्षं, असंख्य भूमिका, अनेक वाद, प्रचंड चाहतावर्ग आणि एक अशी स्टार पॉवर जी पिढ्या बदलल्या तरी कायम राहिली. सलमान खानचा प्रवास म्हणजे फक्त एका अभिनेत्याची कारकीर्द नाही… तो बॉलिवूडच्या बदलत्या इतिहासाचा एक भाग आहे. (Salman Khan)


Comments
Add Comment

Paro Film : ‘पारो: वधू गुलामगिरीची अज्ञात कहाणी’ चित्रपट लवकरच; वधू तस्करीचा विषय मांडणारा नवा सिनेमा

महिलांची वधू म्हणून खरेदी-विक्री आणि त्यातून होणारे शोषण या गंभीर सामाजिक समस्येवर भाष्य करणारा ‘पारो: वधू

शिक्षकांच्या संघर्षाची गोष्ट सांगणारा ‘कबीर सर का आखरी लेसन’ इफ्फीमध्ये झळकला

काळ बदलला, वर्ग बदलले, फळ्याची जागा स्मार्ट बोर्डने घेतली. पण या बदलत्या काळात अनेक पिढ्या घडवणारे शिक्षक मात्र

Fulwara Marathi Movie: 'फुलवरा'चा लावणीसाज! वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या नव्या लूकची चर्चा

Fulwara Marathi Movie: रवी जाधव दिग्दर्शित आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘फुलवरा’ या चित्रपटाची उत्सुकता आता

Tu Aahes Na: इफ्फीच्या मंचावर मराठी चित्रपटाची भावुक झलक! ‘तू आहेस ना’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद

Tu Aahes Na: गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) येथे लव फिल्म्स फिल्म्सची

ऑस्कर 2027 च्या शर्यतीत 2 भारतीय चित्रपट! 'गोंधळ' आणि 'अँग'ने मिळवली पात्रता

Oscars 2027 : भारतीय चित्रपट 'गोंधळ' आणि 'अंग' यांनी ऑस्कर 2027 च्या शर्यतीत प्रवेश केला आहे. 'गोंधळ'ला आंतरराष्ट्रीय फीचर

Dhadkan Sequel: 26 वर्षांनंतर 'धडकन 2' येणार? अक्षय-शिल्पाच्या जागी दिसणार नवी जोडी!

Dhadkan 2 : सध्या बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांचे सिक्वेल आणि रिमेक बनवण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. 90 च्या