Amaal Mallik : अमाल मलिकचा चित्रपट संगीताला तात्पुरता विराम; म्हणाला, ‘आता माझ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार’

मुंबई : संगीतकार आणि गायक अमाल मलिकने सध्यापुरता चित्रपटांसाठी नवीन संगीत देण्यापासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गुरुवारी ‘एक्स’वर भावनिक पोस्ट शेअर करत अमालने आपल्या मानसिक, शारीरिक आणि सर्वांगीण आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी काही काळ विश्रांती घेणार असल्याचे सांगितले. (Amaal Mallik)


अमालने चाहत्यांना आपण पूर्णपणे ठीक असल्याचे सांगत, सध्या स्वतःसाठी योग्य असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे म्हटले. “माझ्या मन, शरीर, आत्मा आणि सर्वांगीण आरोग्यासाठी मला थोडी विश्रांती हवी आहे,” असे त्याने पोस्टमध्ये नमूद केले. अमालने पुढील वर्षापर्यंत चित्रपटांसाठी नवीन गाणी संगीतबद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यापूर्वीच संगीतबद्ध केलेली काही गाणी संबंधित चित्रपट प्रदर्शित झाल्यास प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतात. यातील काही चित्रपट कमी बजेटचे असून, त्यांच्या प्रदर्शनाबाबत अद्याप निश्चितता नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. (Amaal Mallik)



नुकतेच अमालचे ‘ये अवारपन’ हे गाणे इम्रान हाश्मीच्या ‘अवारपन २’मध्ये वापरण्यात आले होते. आपल्या संगीतप्रवासाचा उल्लेख करत अमालने चाहत्यांना लवकरच नव्या उर्जेसह आणि मनापासून संगीत घेऊन परतण्याचे आश्वासन दिले.


दरम्यान, चाहत्यांनी त्याच्या निर्णयाचे स्वागत करत सोशल मीडियावर पाठिंबा दर्शवला आहे. “मला थोडा वेळ एकटं राहू द्या. माहिती मिळताच तुम्हाला कळवीन,” अशी विनंतीही अमालने चाहत्यांना केली. (Amaal Mallik)


अमालने आपल्या पोस्टच्या शेवटी हा कायमचा निरोप नसल्याचे स्पष्ट करत, “आता माझा निरोप घ्या, मी परत येईन,” असे म्हटले. त्यामुळे चित्रपट संगीतापासून हा विराम तात्पुरता असून, भविष्यात अमाल पुन्हा संगीतविश्वात सक्रिय होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या