Ankit Baliyan Murder : जिमबाहेर थरार! प्रसिद्ध हरियाणवी गायक अंकित बलियानची गोळ्या झाडून हत्या; परिसरात प्रचंड खळबळ

शामली :  उत्तर प्रदेशातील शामली येथे हरियाणवी संगीत क्षेत्रातील गायक आणि अभिनेता अंकित बलियान यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ‘भरी कोर्ट में गोली मारेंगे मेरी जान’ या गाण्यामुळे अंकित बलियान प्रसिद्ध झाले होते. बुधवारी सायंकाळी जिममधून बाहेर पडताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, अंकित बलियान शामलीतील एका जिममध्ये नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी गेले होते. व्यायाम झाल्यानंतर ते जिममधून बाहेर पडले. त्याचवेळी आधीपासून दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांची संख्या 3 ते 4 असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोरांनी अंकित यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.



गोळीबारानंतर परिसरातील नागरिकांनी जखमी अंकित यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच शामली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.


हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अंकित बलियान यांचा पूर्वी सोनीपत परिसरातही वावर होता. त्यामुळे या हत्येचा संबंध जुन्या वादाशी आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणात हरियाणा पोलिसांशीही संपर्क साधला जात असल्याची माहिती आहे.


दरम्यान, अंकित गेल्या काही महिन्यांपासून शामलीतील संबंधित जिममध्ये व्यायामासाठी येत होते. त्यांच्या हत्येने हरियाणवी संगीत क्षेत्रासह त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली असून, हत्येमागील कारण आणि हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास