Prasad Lad : मराठा समाजासाठीच्या 'जीआर'च्या अंमलबजावणीत आडकाठी आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार - प्रसाद लाड यांची माहिती

मनोज जरांगे यांच्या मागण्या मुख्यमंत्री पूर्ण करतील असा विश्वास


मुंबई : मराठा समाजाबाबतचे शासन निर्णय (जीआर) योग्य प्रकारे लागू करण्यामध्ये जर कोणी अधिकारी जाणीवपूर्वक आडकाठी आणत असेल, तर अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, माहिती भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी शुक्रवारी दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून त्यांच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



मुंबईत रक्षाबंधन सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत भाष्य केले. जरांगे यांनी मुंबईऐवजी अंतरवाली सराटीत उपोषण करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत लाड म्हणाले की, सणासुदीच्या काळात मुंबईत त्रास होऊ नये म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती. त्याचा त्यांनी मान राखला. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण जीआर काढले आहेत, परंतु प्रशासकीय पातळीवर काही ठिकाणी तफावत राहिल्यामुळे हे आदेश ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत पूर्णपणे पोहोचू शकले नाहीत, हे त्यांनी मान्य केले.



मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला स्पष्ट निर्देश दिले असून, जे अधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत किंवा कागदपत्रांच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण करत आहेत, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे लाड यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Thane Fire News : ठाणे हादरले! दिवा-शिल रोडवरील व्यावसायिक संकुलात भीषण आग; चार गोदामे जळून खाक, मोठी जीवितहानी टळली

ठाणे : ठाण्यातील दिवा-शिल रोड परिसरामध्ये गुरुवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि खळबळजनक आगीची घटना घडली. एका

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

मंत्रोच्चाराच्या घोषात त्र्यंबकेश्वर येथे विधिवत ध्वजस्तंभ पूजन, 31 फूट उंच भव्य ध्वजस्तंभाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन; पाहा खास क्षण

[caption id="attachment_1066607" align="aligncenter" width="800"] त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विधिवत

सचिन सानप शिवसेनेचा उमेदवार नाही! उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत समन्वयाचा अभाव दिसत असताना, उद्योगमंत्री उदय सामंत