Toxic Movie : रिव्ह्यू देणं पडलं महाग! 'टॉक्सिक'वर नकारात्मक बोलणाऱ्या युट्यूबरची अडचण वाढली; निर्मात्यांच्या एका निर्णयाने सिनेसृष्टीत खळबळ

मुंबई :  कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चर्चेत आला आहे. चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत असतानाच, त्याच्या नकारात्मक रिव्ह्यूवरून नवा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी युट्यूबर सूरज कुमार यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याचा दावा खुद्द सूरज यांनी सोशल मीडियावर केला आहे. (Toxic Movie)


सूरज कुमार यांनी त्यांना मिळालेल्या नोटीसचा स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाबाबत त्यांनी पोस्ट केलेल्या रिव्ह्यूवरून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीसमध्ये त्यांच्या ऑनलाइन माध्यमातून चित्रपटाशी संबंधित मजकूर प्रकाशित किंवा प्रसारित केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नोटीस मिळाल्यानंतरही सूरज कुमार यांचा ‘टॉक्सिक’वरील रिव्ह्यू व्हिडीओ ऑनलाइन उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. (Toxic)



दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच निर्मात्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. बंगळूरु येथील अतिरिक्त शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाने 22 ऑगस्ट रोजी अंतरिम आदेश देत चित्रपटाबाबत खोटी किंवा बदनामीकारक माहिती प्रसारित करण्यास काही पक्षांना मनाई केली होती. हा आदेश 28 सप्टेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ( Entertainment News)


या प्रकरणामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांकडून ऑनलाइन रिव्ह्यू आणि सोशल मीडिया कंटेंटवर घेतल्या जाणाऱ्या भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, ‘टॉक्सिक’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याचा दावा करण्यात आला आहे.


गीतू मोहनदास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यशसोबत कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यश आणि व्यंकट के. नारायण यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ( Bollywood News)


Comments
Add Comment

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार

Koffee with Karan: - "मेरे करण अर्जुन आएंगे..." निर्माता करण जोहर नवा चित्रपट आणण्याच्या तयारीत...

चित्रपट निर्माता करण जोहरयाने आजवर वेगवेगळ्या कार्यक्रमातून चाहत्याची मने जिंकली आहेत. आता करण जोहर 'कॉफी विथ

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरात वातावरण तापलं! नकुलसाठी आसिफवर चिडली लव्ह; यंग आणि स्काऊटमध्ये सुद्धा बाचाबाची

Bigg Boss 20 च्या घरात नेहमीच काहीना काही रंजक गोष्टी घडत असतात. अनेकदा स्पर्धकांमध्ये भांडणं होतात. कधी कधी तर ही भांडणं