Nashik : हायटेक कॉपीचा पर्दाफाश ! परीक्षेत मोबाईलवर गूगल सर्च करताना उमेदवार रंगेहाथ पकडला

Nashik : मुंबई उच्च न्यायालयासह नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील हमाल, शिपाई आणि फराश या पदांच्या ९०० हून अधिक जागांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय परीक्षेत हायटेक कॉपीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक शहरातील एका परीक्षा केंद्रावर चक्क मोबाईलच्या माध्यमातून गुगलवर प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या एका उमेदवाराला पर्यवेक्षकांनी रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) बीएनएसच्या संबंधित कलमांसह महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime News)



नेमकं प्रकरण काय ?


नाशिकच्या कॉलेज रोडवरील एस.एम.आर.के. महाविद्यालयातील हॉल क्रमांक ११ मध्ये शिपाई पदासाठी २६ ऑगस्ट २०२६ रोजी परीक्षा सुरू होती. यावेळी नाशिकरोड येथील सह दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तराचे सहायक अधीक्षक तुषार वडघुले आणि प्राध्यापक सौरभ देशपांडे हे पर्यवेक्षक म्हणून कर्तव्यावर होते. परीक्षा सुरू असताना ३० वर्षीय परीक्षार्थी मनोज निवृत्ती वाघ याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पर्यवेक्षकांनी त्याच्यावर लक्ष ठेवले. त्याची तपासणी केली असता परीक्षा कक्षात मोबाईल नेण्यास मनाई असतानाही त्याने चोरून मोबाईल आत आणल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, मनोज वाघ हा या मोबाईलच्या माध्यमातून गुगलवर प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे शोधत असल्याचे पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे परीक्षा केंद्रातच सुरू असलेला हा हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला. (Nashik Crime News)



सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह ! तपास सुरु


पर्यवेक्षकांनी तत्काळ मोबाईल ताब्यात घेऊन संबंधित उमेदवाराला पकडले. त्यानंतर सहायक अधीक्षक तुषार वडघुले यांनी सरकारतर्फे गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मनोज वाघ याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मात्र या संपूर्ण घटनेनंतर परीक्षा केंद्रातील सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. परीक्षा केंद्रावर प्रवेशाच्या वेळी तपासणी केली जात असतानाही संबंधित उमेदवार मोबाईल फोन परीक्षा कक्षापर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी कसा झाला, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. एकीकडे हजारो उमेदवार प्रामाणिकपणे परीक्षा देण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत असताना, दुसरीकडे अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी करण्याचा प्रयत्न होत असल्याने परीक्षा व्यवस्थेची कडक तपासणी आणि सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील करत आहेत.

Comments
Add Comment

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या