Sunday, August 30, 2026

Thane Mayor Marathon : 'गतिशील ठाणे'! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन संपन्न

Thane Mayor Marathon : 'गतिशील ठाणे'! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन संपन्न

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित 32 व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनला रविवारी मोठा प्रतिसाद मिळाला. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये 30 हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवत मॅरेथॉनला सुरुवात करून स्वतःही धाव घेतली. त्यांच्या सहभागामुळे धावपटू आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. (Thane Mayor Marathon)

‘धाव प्रगतीची, गतिशील ठाण्याची’ ही यंदाच्या मॅरेथॉनची संकल्पना होती. ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, लोकप्रतिनिधी, कलाकार आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी धावपटूंना प्रोत्साहन दिले.

https://www.prahaar.in/2026/08/30/what-exactly-happened-on-indias-got-latent-2-bjp-mla-furious-with-samay-raina/

मॅरेथॉनमध्ये सहभागी होताना एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात विकासकामांना वेग देतानाच क्रीडा क्षेत्रालाही प्रोत्साहन दिले जात असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना आणि खेळाडूंना चांगल्या सुविधा आणि संधी उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचे त्यांनी नमूद केले. ठाण्यातून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे खेळाडू तयार व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनला 32 वर्षांची परंपरा आहे. स्वर्गीय खासदार सतीश प्रधान यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या स्पर्धेने ठाण्यातील क्रीडा क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. यंदाच्या आयोजनातून फिटनेससोबतच शहराच्या विकासाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ( Marathon 2026)

यावेळी शिंदे यांनी ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’च्या माध्यमातून देशातील युवकांना क्रीडा क्षेत्रात संधी मिळत असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत चांगली कामगिरी करत असून त्यांना आवश्यक सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “खेळामध्ये राजकारण आणू नये; खेळ हा खिलाडूवृत्तीनेच खेळला पाहिजे,” असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमाला लता एकनाथ शिंदे, माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी, आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, खेळाडू, कलाकार आणि ठाणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Thane Municipal Corporation)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >