 |
वाढते सहकार्य मिळेल
मेष : आपणास जीवनातील प्रत्येक वळणावर आपला जोडीदार तसेच परिवारातील व्यक्ती यांचा सहयोग लाभणार आहे. व्यवसायातील काही कामे महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने पूर्ण कराल. आपल्याला मित्रांचा व सहयोगी व्यक्तींचा पूर्ण सहकार लाभणार आहे. व्यापार व्यवसायांमध्ये आपले वडील किंवा ज्येष्ठ व्यक्ती यांच्या सल्ल्याचा फायदा होणार आहे. व्यापार व्यवसायांमध्ये नवीन करारमदार करताना आपण सतर्क असावे. या कालावधीमध्ये शत्रु तोंड वर काढू शकतच नाही ते पूर्णपणे नामोहरम होणार आहे. अध्यात्म आणि सामाजिक क्षेत्र याच्यामध्ये आवड निर्माण होईल.
|
 |
दाम्पत्य जीवनासाठी उत्तम कालावधी
वृषभ : आपल्या भावनांवर संयम ठेवा. कोणतेही असे कार्य करू नका की तुम्हाला स्वतः अडचणीत याल. प्रेमिकांसाठी चांगला कालावधी. सरकारी कामे करणाऱ्यांसाठी महत्त्वाची कामे सोपवली जातील. मात्र या कालावधीमध्ये महिलांसोबत काम करताना सावधगिरी बाळगा. सप्ताहाच्या मध्यावधी कालामध्ये संततीची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना वाहन सावकाश चालवा ही सूचना देणे महत्वाचे आहे. दाम्पत्य जीवनासाठी हा कालावधी चांगला आहे. कुटुंबातील सदस्य एकमेकांना सहयोग करतील ,त्यांच्या मध्ये चांगला समन्वय असेल. प्रकृतीमध्ये सुधारणा होईल.
|
 |
प्रगतीचे नवे मार्ग मिळतील
मिथुन : टेक्निकल गोष्टीमध्ये काम करणाऱ्यांना अतिशय उत्तम कालावधी आहे. त्यांना आपल्या क्षेत्रामध्ये उत्तम सफलता मिळणार आहे कुटुंबाच्या दृष्टिकोनातून घरांमध्ये पाहुण्यांची ये-जा राहील. मुलांच्या फर्माईशी पूर्ण करण्यामध्ये आपला जोडीदार व्यस्त राहील. नोकरी-व्यवसाय करणाऱ्या महिलांचा सन्मान होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली सफलता मिळेल. सप्ताहाच्या अखेरीस आपणास नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे पण नवीन कामे विचारपूर्वक घ्या. शेअर मार्केटच्या संबंधित व्यक्तींनी विचारपूर्वकच गुंतवणूक करणे आवश्यक आहे.विवाह इच्छुक व्यक्तींचा चांगल्या घराण्यातील व्यक्तींशी विवाह ठरू शकतो.
|
 |
आरोग्य सांभाळा
कर्क : घरातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी आपण घ्या.विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात असेल, पण ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यावयाची आहे, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षेची तारीख पुढे जाऊ शकते. किंवा स्वतः तरी आजारी पडू शकता, किंवा कोणत्याही कारणाने आपण परीक्षा देऊ शकणार नाही. सरकारी कामे पूर्ण करण्यासाठी कोणत्यातरी मोठ्या अधिकारी व्यक्तीची ओळख असण्याची आवश्यकता भासणार आहे. कोणीतरी बाहेरील व्यक्ती आपल्या कार्यावर डाग लावण्याची शक्यता आहे. काळजी घ्या.
|
 |
विशेष यश मिळेल
सिंह : या सप्ताहामध्ये आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण आपली पत्थे जरूर पाळावीत. आपल्याला जर डायबिटीस किंवा हृदयासंबंधी काही आजार असल्यास विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.शिक्षणासाठी हा कालावधी आपणास चांगला आहे नवीन कुठलातरी छोटा कोर्स पूर्ण करण्याकडे आपले लक्ष राहील कोणत्याही टेक्निकल साईड मध्ये आपल्याला विशेष यश मिळेल. मात्र कोणत्याही कारणास्तव आळस करू नका. जास्त कष्ट आपणास यश देणारा आहे.
|
 |
पत-प्रतिष्ठेत वृद्धि
कन्या : आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला यश येणार आहे. पत-प्रतिष्ठा याच्यामध्ये वृद्धि होईल. काही जुनी थांबलेली कामे परत सुरु होतील. आपल्याला जर काही गुंतवणूक करायची असेल तर सोन्या मध्ये केलेली चांगली ठरणार आहे. व्यापार व्यवसायामध्ये काही देणे घेण्याचे व्यवहार थांबले असतील, तर ते या काळामध्ये पूर्ण होतील. मात्र या कालावधीमध्ये काही गुप्त शत्रू तोंड वर काढण्याची शक्यता आहे, त्यांच्यापासून सावध राहणे इष्ट.कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असणार आहे. व्यापार व्यवसाय चांगला चालत असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या कोणतेही प्रश्न असणार नाहीत.
|
 |
आर्थिक गुंतवणूक काळजीपूर्वक करा
तूळ : कामांमध्ये जास्तीचा लोड वाढणार आहे. त्या प्रमाणात आपला उत्साह कमी वाटणार आहे. आपण परिस्थितीशी सामना करण्यासाठी खूप प्रयत्न कराल पण समाधान आपणास कमीच वाटेल. सप्ताहाच्या मध्यावधी मध्ये आपणास आत्मविश्वास कमी असल्याचे भासेल, पण आपण आत्मविश्वासाने कामे करावीत. आर्थिक गुंतवणूक करताना खूप सावधानता पाळली पाहिजे. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीसाठी आत्मपरीक्षणाची गरज आहे, विद्यार्थ्यांना हा कालावधी खूप महत्त्वपूर्ण आहे. कठीण परिस्थितीमध्ये पण आपण यश संपादन कराल.
|
 |
प्रगतीचे मार्ग प्रश्स्थ होतील
वृश्चिक : आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खूपच उत्साही राहाल. आपल्यामध्ये उच्च प्रतीचा उत्साह असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्यास तयार असणार आहात. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण यश खेचून आणाल .कुठलेही काम आपण धाडसाने कराल. सप्ताहाच्या मध्यावधी मध्ये एखादे कठीण काम समोर येईल, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे प्रगतीची दारे आपणास खुली होतील. या कालावधीमध्ये आपण आपल्या जोडीदाराबरोबर चांगले क्षण व्यतीत कराल. जीवनात स्थिरता आणण्यासाठी आपण प्रयत्नशील रहाल.
|
 |
वैवाहिक सौख्य लाभेल
धनु : ज्या तरुण-तरुणींचा मंगळ असल्याकारणाने विवाह थांबला असेल, तर त्यांचे विवाह ठरतील.विवाहित व्यक्तींचे वैवाहिक जीवन सुख शांती पूर्वक राहील.मात्र आपल्या संतती विषयी काही प्रकृतीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संततीच्या भविष्याविषयी आपण चिंतीत असाल.गर्भवती स्त्रियांनी सुद्धा आपली स्वतःची काळजी घेणे महत्वाचे आहे.प्रेमिकांना पण आपल्या नात्या संबंधी आपण गंभीर असावयास पाहिजे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी नीट सांभाळा, पोटाच्या विकाराचा संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे.
|
 |
अपेक्षित सफलता मिळणार आहे
मकर : आपण जर सरकारी क्षेत्रात काम करत असाल, तर या कालावधीमध्ये आपल्याला अपेक्षित सफलता मिळणार आहे. फायनान्स आणि रियल इस्टेट क्षेत्रामध्ये आपण काम करत असाल तरी सुद्धा आपणास चांगली फळे मिळणार आहेत. ज्यांचे कमिशन एजंट चे काम आहे त्यांनाही या कालावधीमध्ये चांगले आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. नवदाम्पत्य आपल्या जीवनाचा भरपूर आनंद लुटणार आहेत.स्पर्धा परीक्षेसाठी चे विद्यार्थी तयारी करत आहेत, त्यांना जास्त अभ्यास करण्याची गरज आहे.कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये गंभीर परिस्थितीमध्ये शत्रूंना तोंड देण्याची तयारी आपली असली पाहिजे.
|
 |
अनेकानेक मार्गांनी धनलाभ
कुंभ : आर्थिक दृष्ट्या हा कालावधी आपणासाठी अतिउत्तम आहे. आपणास एकापेक्षा जास्त ठिकाणाहून धनप्राप्ती होऊ शकते. टेक्नॉलॉजी, मीडिया,सोशल मिडीया अशा माध्यमातून आपणाला धनप्राप्ती होऊ शकते.नोकरी करणार्या व्यक्तींना महिला सहकार्या कडून सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे आपण जास्तीची अर्थप्राप्ती करू शकता. एकमेकांच्या सहकार्यामुळे आपण पुढे जाऊ शकता. विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये पूर्ण लक्ष केंद्रित असेल. आपले शिक्षक तसेच आपले पालक आपणासाठी पूर्ण सहयोग देतील.
|
 |
नोकरी मिळेल
मीन : नोकरी करणाऱ्यांना उच्च व प्रतिष्ठित लोकांच्या गाठी भेटी होण्याची शक्यता आहे.त्यांची ओळख पुढे वाढणार आहे, त्याचा उपयोग आपणास लाभप्रद होणार आहे. जे जातक बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळेल. नोकरीत बढतीचे योग आहेत. आपण जर कुठली जागा खरेदी किंवा विक्री साठी विचार करत असाल, तर ते आपणासाठी लाभदायक आहे. प्रेमी प्रेमिकांना प्रेम व्यक्त करण्यासाठी हा कालावधी चांगला आहे. समोरून सकारात्मकच उत्तर मिळणार आहे. विवाहासाठी सुद्धा हा कालावधी चांगला आहे.
|