Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला. जिजामाता गार्डनसमोर, मेहबूब स्टुडिओ परिसरात रस्ता ओलांडत असताना इनोव्हा क्रिस्टाने अंशला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अंशला तातडीने होली फॅमिली रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. (Bandra)


मिळालेल्या माहितीनुसार, अंश हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. लग्नानंतर तब्बल 15 वर्षांनी त्याचा जन्म झाला होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूने गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंशचे वडील रवींद्र गुप्ता रस्त्यावर चणे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. (Hit And Run)



प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अंश रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने त्याला धडक दिली. कार त्याच्या अंगावरून गेल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून वाहनचालकांच्या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. (Accident)


या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी कारचालक मेघा रावल हिला अटक केली आहे. ती मोबाईलवर बोलत असताना अतिवेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी तिच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 105, 281 आणि 125 तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Bandra Police)


दरम्यान, अपघाताच्या काही वेळ आधी अंशने आईकडे चिकन बनवण्याचा हट्ट केला होता. श्रावण महिना संपल्यानंतर त्याने आईकडे ही इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर तो घराबाहेर खेळण्यासाठी गेला. काही वेळाने तो दिसत नसल्याने आई त्याचा शोध घेत होती. मात्र, त्याचदरम्यान अंशचा अपघात झाल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. एका अपघाताने या कुटुंबाचा एकुलता एक आधार हिरावला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या

BMC Road Work : आता वारंवार चर खणल्याने रस्त्यांचे होणारे नुकसान होणार कमी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर विविध उपयोगिता जाळे अर्थात