ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून शासनाच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. या प्रवाशांना सवलतीचे तिकीट NCMC कार्डच्या माध्यमातूनच देण्यात येणार आहे.


त्यामुळे सवलतीचा लाभ घेणाऱ्या संबंधित प्रवाशांनी प्रवासाच्या वेळी NCMC कार्ड सोबत ठेवावे, तसेच कार्डमध्ये आवश्यक रक्कम Top-up करून ठेवावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.



NCMC कार्डची नोंदणी सुरू


शासनाच्या निर्देशानुसार विविध सामाजिक घटकांना एसटी प्रवासात सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. या सवलतीच्या प्रक्रियेत अधिक सुलभता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संबंधित प्रवाशांचे NCMC कार्ड तयार करण्यात येत आहे.


NCMC कार्डची नोंदणी आणि वितरणासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांच्या NCMC कार्डची नोंदणी व वितरण सुरू आहे. त्यानंतर इतर सवलतधारक प्रवाशांसाठीही NCMC कार्डची नोंदणी आणि वितरण करण्यात येणार आहे. महामंडळाच्या माहितीनुसार, आतापर्यंत १ कोटी ११ लाख ७८ हजार ९०० नागरिकांनी NCMC कार्डची नोंदणी केली आहे.



कार्डमध्ये पैसे Top-up करणे आवश्यक


१ सप्टेंबरपासून संबंधित प्रवाशांना सवलतीचे तिकीट NCMC कार्डच्या माध्यमातूनच देण्यात येणार असल्याने कार्डमध्ये आवश्यक रक्कम उपलब्ध असणे गरजेचे आहे. प्रवाशांनी कार्डचे Top-up म्हणजेच त्यात रक्कम जमा करून ठेवणे आवश्यक आहे. या प्रक्रियेबाबतची मानक कार्यप्रणाली (SOP) एसटीच्या संबंधित आगारांना पाठवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी वेळेत कार्डची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तात्पुरती सवलत


७५ वर्षांवरील ‘अमृत ज्येष्ठ नागरिकां’ना NCMC कार्डची सक्ती करण्यात काही काळाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या वयोगटातील काही ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणीदरम्यान हाताचे ठसे न उमटणे यासारख्या तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी NCMC कार्डची सक्ती तत्काळ लागू करण्यात आलेली नाही.



१ सप्टेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन


एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना १ सप्टेंबरपूर्वी जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून NCMC कार्डची नोंदणी व वितरणाची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रवासाच्या वेळी कार्ड सोबत ठेवून त्यामध्ये आवश्यक रक्कम Top-up करून ठेवावी, असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे. ऐन प्रवासाच्या वेळी सवलतीच्या तिकिटासाठी अडचण होऊ नये, यासाठी प्रवाशांनी NCMC कार्डची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी