Monday, August 31, 2026

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १ सप्टेंबरपासून लागू होणार असल्याची माहिती कंपनीने दिली. घरगुती पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या (पीएनजी) दरातही प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटर (एससीएम) एक रुपयाची वाढ केल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. यामुळे सध्या ८६ रुपये किलो दराने उपलब्ध असलेला सीएनजी मंगळवार १ सप्टेंबरपासून ८८ रुपये किलो दराने उपलब्ध होणार आहे. तसेच ५२ रुपये दराने उपलब्ध असलेला पीएनजी मंगळवार १ सप्टेंबरपासून ५३ रुपये स्टँडर्ड क्यूबिक मीटर (एससीएम) दराने उपलब्ध होणार आहे.

अमेरिका - इराण युद्ध आणि रशिया - युक्रेन युद्ध यामुळे कच्च्या मालाच्या खर्चात झालेल्या तीव्र वाढीमुळे ही दरवाढ झाल्याचे महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) जाहीर केले आहे. सीएनजीच्या वाढत्या मागणीमुळे गरजेचा मोठा भाग आयात केलेल्या स्पॉट रिगॅसिफाइड लिक्विफाइड नॅचरल गॅस (RLNG) मधून भागवावा लागत आहे, जो अधिक महाग झाला आहे. गॅस मिळवण्याच्या वाढलेल्या खर्चामुळे एकूण उत्पादन खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे. यामुळेच सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे, असे महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सांगितले. दरवाढीचा परिणाम सामान्य वाहतुकीवर तसेच मालवाहतुकीवरही होण्याची शक्यता आहे. वाहतूक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा