Sunday, November 29, 2026

BMC Water Pipeline Leakage : पाणी गळती दुरुस्तीच्या कामांसाठी घाटकोपरला २७ कोटींचा ‘बूस्टर’!

गळतीसह जलवाहिनीच्या कामांचा खर्च ३.२८ कोटींनी वाढला,एकूण खर्च २३.९६ कोटींवरून २७.२५ कोटींच्या घरात पोहोचला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर भागातील जलवाहिनीतून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या जल अभियंता खात्याने तब्बल २३.९४ कोटी रुपयांचे कंत्राट मंजूर करून दिले होते. त्यानुसार विभागांमध्ये जलवाहिनीतील गळती दुरुस्तीचे काम करण्यात आले. परंतु आता याच कामांमध्ये आता तब्बल ३.२८ कोटी रुपयांची वाढ झाली असून हे कंत्राट तब्बल २७.२५ कोटींच्य घरात जावून पोहोचले आहे. (Mumbai Municipal Corporation) या कामांसाठी कंत्राटदार स्वस्तिक कंस्ट्रक्शन्स कंपनीची निवड करण्यात आली होती. (BMC Water Pipeline Leakage) याच कंपनीच्या माध्यमातून मूळ कंत्राट कामांमध्ये किती गळती दुरुस्ती किंवा जलवाहिनी बदलण्याचे काम केले याची माहिती तर दिली नाहीच, उलट सुमारे सव्वा तीन कोटी रुपयांच्या वाढीव कामांचाही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे वाढीव कामांचा पैसा नक्की कुणासाठी असा सवाल उपस्थित केला जात असून या स्वस्तिक कंस्ट्रक्शन कंपनीला बुस्टर देण्याचे काम प्रशासन करत आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

पूर्व उपनगरातील महापालिकेच्या घाटकोपर "एन" विभागातील पाणी गळती थांबवणे, दूषितीकरण रोखणे आणि इतर संलग्न कामे करण्यासाठी सन २०२४-२६ या कालावधीसठी स्वस्तिक कंस्ट्रक्शन्सला कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राट निव्वळ १९.५९ कोटी रुपयांचे होते, तर विविध करांसह या कंत्राटाची रक्कम २३.९६ कोटी रुपये एवढी होती. ( Ghatkopar News)

प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दूषित पाणी पुरवठ्याचे निराकरण, पाण्याची गळती थांबवणे, स्लुस व्हॉल्व्ह बसवणे, नवीन छेद जोडणी, पाणी पुरवठ्यात सुधारणा, तसेच नवीन जलवाहिनी टाकणे अशी कामे वाढवण्यात आली. त्यामुळे हा खर्च वाढला असून या वाढीव फेरफाराचा प्रस्ताव सादर स्थायी समितीला सादर करण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >