Monday, August 31, 2026

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर दिली.

याआधी सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर झाली. या बैठकीत शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय झाला. शिबिरात ७५० प्रमुख नेते, निमंत्रित कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना बोलावण्यात येईल. यामध्ये सर्व जिल्हाध्यक्ष, महानगर प्रदेश यातील प्रमुखांना निमंत्रित करण्यात येईल.

शिबिराचा अजेंडा ठरवण्यासाठी लवकरच पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक होणार असल्याचे तटकरे म्हणाले. जेन झी सोबत थेट संवाद साधण्यासाठी शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. अजित पवार तरुणाईत लोकप्रिय होते. आता नव्याने जेन झी सोबत संवाद साधला जाईल.

आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आमदार दिलीप वळसे पाटील यांना मुख्य समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. दिलीप वळसे पाटील हे राज्यातील २२ जिल्हयात होणाऱ्या निवडणुकीत समन्वयकाचे काम करतील. यामध्ये दौरे करावेत आणि काही सहकाऱ्यांनासोबत घेऊन मर्यादित कालावधीत पक्ष मजबूतीसाठी एक आराखडा तयार करावा अशा सूचनाही सुनिल तटकरे यांनी दिल्या. बीएलओ आणि एसआयआर संदर्भात पक्षाने ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांची प्रमुख समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या समवेत अनिल भाईदास पाटील यांची सहसमन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती संकलित करून पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन अंमलबजावणी किंवा त्रुटी राहिल्या असतील तर त्या दूर केल्या जातील असे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा