Monday, August 31, 2026

Gold Rate Today : ग्राहकांना सोन्यासारखी संधी! बाजारात सोन्याचे दर घसरले; पहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Gold Rate Today : ग्राहकांना सोन्यासारखी संधी! बाजारात सोन्याचे दर घसरले; पहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यातच सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज तब्बल 1,470 रुपयांची घट झाली आहे. सोन्याचे दर कमी झाल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला असून सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी वाढत आहे. मात्र, चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. (Gold Rate)

गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार, आज 24 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा दर 1,56,770 रुपये झाला आहे. कालच्या तुलनेत त्यात 1,470 रुपयांची घट झाली आहे. 10 तोळे 24 कॅरेट सोन्यासाठी आज 15,67,700 रुपये मोजावे लागतील. म्हणजेच 10 तोळ्यांच्या दरात 14,700 रुपयांची घट झाली आहे. (Gold Price)

22 कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. 22 कॅरेटचे 1 तोळा सोने आज 1,350 रुपयांनी स्वस्त झाले असून त्याची किंमत 1,43,700 रुपये आहे. तर 10 तोळे 22 कॅरेट सोन्याचा दर 14,37,500 रुपये झाला आहे. सोन्याचे दागिने प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्यापासून तयार केले जात असल्याने या दरातील घसरणीचा थेट फायदा दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना होऊ शकतो. (Silver Rate Today)

18 कॅरेट सोन्याच्या दरातही 830 रुपयांची घट झाली आहे. आज 1 तोळा 18 कॅरेट सोन्याचा दर 1,17,850 रुपये असून 10 तोळ्यांसाठी 11,78,500 रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Rate Today)

दरम्यान, सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज 1 ग्रॅम चांदीचा दर 255 रुपये असून 1 किलो चांदीसाठी 2,55,000 रुपये मोजावे लागतील.

सोन्या-चांदीचे दर बाजारातील परिस्थितीनुसार दररोज बदलू शकतात. त्यामुळे दागिने किंवा चांदीची खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफा बाजारातील ताजे दर तपासणे योग्य ठरेल. ( Gold Price Update)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा